कोरोनाने ओढवले यांच्यावरही संकट; थंड करणारा व्यवसायच थंड

potters unable to sale their products in lockdown
potters unable to sale their products in lockdown
Updated on

नागपूर : उन्हाळ्यात थंड पाण्याची गरज लक्षात घेता जानेवारीपूर्वीच तयार केलेले माठ घरातच पडून असल्याने कुंभार समाजातील कारागिरांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. ऐन हंगामात कोरोनामुळे गरिबांच्या 'फ्रीज'चा व्यवसाय पूर्ण बंद असल्याने कुंभार समाजातील कारागिरांचे वर्षभराचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.

कोरोनाच्या संकटाने  संपूर्ण उद्योग बंद आहे. यात हंगामानुसार व्यवसाय करणाऱ्यांना जोरदार फटका बसला आहे. कुंभार समाजही याला अपवाद नाही.  गावखेड्यातील अनेकजन माठच नव्हे तर रांजण आदी तयार करून शहरात उन्हाळा सुरू झाल्यानंतर विक्रीसाठी आणतात. खेड्यात वर्षभर माठ तयार केले जाते. छोटे शहरातील कारागीरही डिसेंबर, जानेवारीपासून विविध आकर्षक पद्धतीने माठ, सूरई तयार करतात.

उन्हाळ्यात माठाला घरगुतीच नव्हे तर विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयात मोठी मागणी असते. त्यामुळे हंगामात मोठी कमाई पदरात पडते. यातून अनेकजण आपले वर्षभराचे आर्थिक नियोजन करतो. कोरोनाच्या संकटाने मात्र बनवलेले माठ घरातच पडून राहिल्याने कुंभार समाजातील कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. चक्र फिरवत थंड पाण्याचे माठ तयार करणाऱ्या या कारागिरांचे आर्थिक चक्रच कोरोनामुळे थांबले. ऐन हंगामात त्यांच्यावर घरात बसण्याची वेळ आली आहे.

उन्हाची तीव्रता वाढू लागताच मार्च, एप्रिल व मे या महिन्यांमध्ये माठ हे गरीबांचे फ्रीज म्हणून बाजारात विक्री साठी येतात. परंतु, कोरोना विषाणूचा प्रकोप टाळण्यासाठी  लॉकडाऊन व संचारबंदी लागू असल्याने शहरात माठ विक्री होणारे महाल, सक्करदरा, इतवारी, इंदोरा यासारखे बाजार बंद झाले आहेत. बाजार  नाहीत, परिणामी विक्री नाही. यामुळे कुंभार समाजातील  कारागिरांपुढे पोटाची खळगी भरायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मार्च, एप्रिल व मे या कालावधीत  मातीचे माठांना मोठी मागणी असते. कोरोना संकटामुळे हा व्यवसाय कोलमडला अनं व्यावसायिकाचे बजेटही कोलमडले.

आता 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आले. त्यानंतरही ते कुठपर्यंत चालेल व कधी बाजारपेठ खुली होईल याबाबत साशंकता असल्याने कुंभार  कारागिर आर्थिक संकटात सापडला आहे. परंपरागत कला जपत माठ बनविण्याव्यतिरिक्त पोट भरण्याचे दुसरे साधन नसलेले कुंभार कारागिरही मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या  उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे माठ बनविण्यासाठी लागणारे साहित्य माती, उसाचा भुकटा, भाजण्यासाठी लागणारे इंधन यांचा खर्चही अंगावर पडला आहे.

उपाययोजना करण्याची गरज

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कारागिरांना सरकार गरजू लोकांना मदत करीत आहे. कुंभार समाजालाही  उदरनिर्वाहासाठी शासनाने उपाययोजना करावी अशी मागणी केल्या जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com