ऊर्जामंत्री म्हणाले, केंद्राच्या योजनेची अडवणूक नाही

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 जानेवारी 2020

औद्योगिक क्षेत्रासाठी सवलतीच्या दरात वीजपुरवठा केला जाईल. वीजपुरवठा करताना शेतकऱ्यांना कशाप्रकारे दिलासा देता येईल, यावर भर दिला जाईल. राज्यातील ऊर्जा विभागाच्या रखडलेल्या कामांना प्राधान्य देत पूर्ण केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. मंत्रिमंडळात कुठल्या क्रमांकावर कोण आहे, यापेक्षा जबाबदारी कशाप्रकारे पार पाडता येईल, हे महत्त्वाचे असल्याचेही डॉ. राऊत एका प्रश्‍नाच्या उत्तरात म्हणाले. 

नागपूर : केंद्र सरकारच्या कुठल्याही योजनेची अडवणूक राज्य सरकार करणार नाही. परंतु, केंद्र सरकारची कुठलीही विकास योजनाच नाही, असा टोला राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी हाणला. केंद्र सरकार केवळ मंदिर, काश्‍मीर, नागरिकत्व यावरच काम करीत आहे. सामान्यांच्या विकासाची कुठलीही योजना दिसून येत नसल्याची पुश्‍तीही त्यांनी जोडली. राज्याला भारनियमनमुक्त तसेच शेतकऱ्यांना विजेबाबत दिलासा देण्याचे लक्ष्य असल्याचेही ते म्हणाले. 

सविस्तर वाचा - घरात सुरू होती लग्नाची तयारी आणि 'तो' बोहल्यावर चढण्यापूर्वीच...

राज्यातील मंत्र्यांना अधिकृत खातेवाटप करण्यात आले. डॉ. राऊत यांना ऊर्जा मंत्रालय मिळाले. या पार्श्‍वभूमीवर ते काही निवडक पत्रकारांसोबत बोलत होते. राज्य भाजपामुक्त करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आले असून पाच वर्षे कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. प्रत्येक घरात वीज आणि भारनियमनमुक्त राज्य करण्यासाठी ठोस पावले उचलली जातील. महाराष्ट्र व छत्तीसगडमधील वीज दरात मोठी तफावत आहे. ती दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही ते म्हणाले. 

औद्योगिक क्षेत्रासाठी सवलतीच्या दरात वीजपुरवठा केला जाईल. वीजपुरवठा करताना शेतकऱ्यांना कशाप्रकारे दिलासा देता येईल, यावर भर दिला जाईल. राज्यातील ऊर्जा विभागाच्या रखडलेल्या कामांना प्राधान्य देत पूर्ण केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. मंत्रिमंडळात कुठल्या क्रमांकावर कोण आहे, यापेक्षा जबाबदारी कशाप्रकारे पार पाडता येईल, हे महत्त्वाचे असल्याचेही डॉ. राऊत एका प्रश्‍नाच्या उत्तरात म्हणाले. 

ऊर्जा खाते मिळणे सौभाग्य

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सरकारमध्ये ऊर्जा खाते सांभाळले. ऊर्जा खाते मिळणे माझ्यासाठी सौभाग्याची बाब आहे, असेही डॉ. नितीन राऊत म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी दिलेली जबाबदारी राज्याला ऊर्जावान करून पार पाडेल, असेही त्यांनी नमूद केले.

क्लिक करा - महिलांनो , न सांगता बाहेर जाऊ नका! अन्यथा पतीचा जीव येईल धोक्‍यात...

पालकमंत्र्यांबाबत मुख्यमंत्री घेणार निर्णय

नागपूरच्याच नव्हे तर सर्वच जिल्ह्यातील पालकमंत्र्यांबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे डॉ. नितीन राऊत यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नागपूरच्या पालकमंत्रीबाबत आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. ऊर्जामंत्री डॉ. राऊत मंगळवारी ऊर्जाखात्याची सूत्रे स्वीकारणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Power Minister said, there is no hindrance to the plan of the Center