२४ जानेवारीला महाराष्ट्र बंद; CAA विरोधात प्रकाश आंबेडकरांनी दिली बंदची हाक..

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 January 2020

नागपूर - येत्या २४ तारखेला वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलंय. CAA म्हणजेच सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदचं आवाहन केलंय. याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेत माध्यमांना याबाबत  माहिती दिली. 

नागपूर - येत्या २४ तारखेला वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलंय. CAA म्हणजेच सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदचं आवाहन केलंय. याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेत माध्यमांना याबाबत  माहिती दिली. 

या पत्रकार परिषदेदरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी भारतीय जनता पक्षावर चांगलंच तोंडसुख घेतलं. मोदी सरकारला मोदी सरकारला आर्थिक परिस्थिती हाताळण्यास अपयश आलंय. त्यामुळे गर्दुल्ला जसा घरातल्या वस्तु विकून गुजराण करतो, त्याच मार्गाने मोदी सरकार सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या विकून कारभार करत असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा म्हटलंय. 

मोठी बातमी : नवी मुंबईत सुरू होणार मुख्यमंत्री कार्यालय ..

प्रकाश आंबेडकर यांच्या पत्रकार परिषदेतील काही महत्त्वाचे मुद्दे : 

  • येत्या २४ जानेवारीला राज्यात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात राज्यव्यापी बंद. ३५ संघटनांचा बंदला पाठींबा
  • आम्ही लोकांना जबरदस्ती करणार नाही. आम्ही लोकांना अपील करत आहोत.
  • संपूर्ण बंद शांततेत केला जाईल
  • व्यापाऱ्यांचा व्यापार ठप्प झालाय, आमचा महिन्याचा खर्च देखील निघत नाही असं व्यापारी म्हणतायत, त्यामुळे ही परिस्थिती पाहून लोकांनी ठरवावं आणि बंदला  पाठिंबा द्यावा 
  • NRC संदर्भात सर्व राजकीय पक्षांनी आपापलं स्वतःचं आंदोलन उभं करावं
  • सध्या देशभरात सुरु असलेली आंदोलनं अराजकीय संस्थांकडून उभं केलं गेलंय. राजकीय पक्षांनी यामध्ये घुखोरी करू नये. स्वतःचं आंदोलन स्वतः उभं करावं
  • माझं शिवसेनेसोबत बोलणं झालं. या बोलण्याप्रमाणे महाराष्ट्रातील एकही माणूस नागरिकत्त्वापासून वंचित राहणार नाही, असं शिवसेनेकडून सांगण्यात आलंय.
  • NRC विरोधातील राज्यांनी एकत्रित येऊन केंद्रात पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे याबाबत बोललं पाहिजे, यावर देशपातळीवर चर्चा व्हावी 
  • राजकीय मुद्दे सुप्रीम कोर्टाने सोडवावेत या मताचा मी नाही.  

prakash ambedkar calls for maharashtra bandh on 24th of january on CAA 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prakash ambedkar calls for maharashtra bandh on 24th of january on CAA