esakal | नवविवाहितेचा सासूसोबत झाला वाद; 'तुमचे काम करून देतो' असे म्हणतं प्रीती दासने केली ही मागणी...

बोलून बातमी शोधा

Preeti Das arrested again in Nagpur

कारागृह प्रशासनाने कोरोना चाचणी केल्यानंतर तिचा स्वीकार केला व कारागृह कोठडीत विलगीकरणात ठेवण्यात आले. दरम्यान, पोलिस आयुक्तांनी प्रकरणांचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला. तिच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यांचा तपास पोलिस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक भानुदास पिदूरकर, उपनिरीक्षक राजकुमार त्रिपाठी आणि दोन महिला अधिकारी करीत आहेत. 

नवविवाहितेचा सासूसोबत झाला वाद; 'तुमचे काम करून देतो' असे म्हणतं प्रीती दासने केली ही मागणी...
sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : 'लुटेरी दुल्हन' नावाने ओळखली जाणारी प्रीती दासला गुन्हे शाखेने कारागृहातून ताब्यात घेतले. एका वायुसेनेच्या अधिकाऱ्याकडून खंडणी उकळल्याप्रकरणी प्रीतीला जरीपटक्‍यातील गुन्ह्यात अटक करण्यात आली. तिला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. प्रीती दासचा सर्व प्रकरणाचा तपास सध्या गुन्हे शाखा करीत आहे, हे विशेष... 

पाचपावली, जरीपटका, लकडगंज आणि सीताबर्डी पोलिस ठाण्यात प्रीती दासविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. तिच्याविरुद्धच्या तक्रारींचा ओघ सुरूच असून, 20 जूनपर्यंत ती पाचपावली पोलिसांच्या ताब्यात होती. तिची पोलिस कोठडी संपताच न्यायदंडाधिकाऱ्यांनी तिची कारागृहात रवानगी केली. 

कारागृह प्रशासनाने कोरोना चाचणी केल्यानंतर तिचा स्वीकार केला व कारागृह कोठडीत विलगीकरणात ठेवण्यात आले. दरम्यान, पोलिस आयुक्तांनी प्रकरणांचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला. तिच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यांचा तपास पोलिस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक भानुदास पिदूरकर, उपनिरीक्षक राजकुमार त्रिपाठी आणि दोन महिला अधिकारी करीत आहेत.

अधिक माहितीसाठी - दुर्दैवी ! खेळण्या-बागडण्याच्या वयात केतेश्‍वरीचे जाणे मनाला हूरहूर लावणारे...

प्रीतीने उकळली खंडणी

जरीपटका हद्दीतील इंदिरा माता टेकडी गोंड मोहल्ला, नागपूर येथे राहणाऱ्या पूर्णाबाई समाके यांचा मुलगा वायुसेनेत नोकरीवर आहे. नवविवाहित सुनेसोबत वाद झाल्यानंतर तिने भरोसा सेलमध्ये पती व सासूविरुद्ध तक्रार केली. तक्रार करताच टपून बसलेल्या प्रीती दासने पूर्णाबाई यांचे घर गाठले. आरोपी प्रीती दासने पूर्णाबाई यांना "तुमचे काम करून देतो.' असे म्हणून त्यांना 25 हजार रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास मुलाची वायुसेनेतील नोकरी गमविणार, अशी धमकी दिली. प्रीतीच्या धमकीला घाबरून पूर्णाबाई यांनी प्रीतीला 25 हजार रुपये दिले. जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात तिची पोलिस कोठडी मागण्यात आली. न्यायदंडाधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेला तिची तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.