आयुक्त मुंढेंची बदली रोखण्यासाठी नागपूरकरांनी लढवली ही शक्कल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जून 2020

आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयामुळे शहरात कोरोना नियंत्रणात असल्याची नागरिकांची भावना आहे. त्यांच्यामुळेच शहर सुरक्षित असल्याचेही अनेक नागरिक मानतात. एवढेच नव्हे तर सत्ताधाऱ्यांच्या मनमानीलाही लगाम त्यांनी लगाम लावली, असेही अनेकांचे मत आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विलगीकरण, प्रतिबंधित क्षेत्र घोषित करणे, त्यात घट करणे, कोविड सेंटर तयार करणे, राजकीय नेत्यांचा विरोध झुगारून प्रशासकीय यंत्रणेकडून उपाययोजना राबविण्याचे काम त्यांनी केले. यातूनच जनसामान्यात त्यांच्याबाबत आपुलकी निर्माण झाली. 

नागपूर : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी राजकीय नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांवर दबाव निर्माण केला जात असल्याच्या माहितीने शहरातील नागरिक चांगलेच खवळले आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल मिडियाद्वारे आयुक्तांची बदली रोखण्यासंदर्भात सोशल मिडियावरून स्वाक्षरी मोहिम सुरू केली. गेल्या तीन दिवसांत 22 हजार नागरिकांनी स्वाक्षरी करीत आयुक्तांच्या संभाव्य बदलीला विरोध केला. 

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर काही कठोर निर्णय घेतले. त्यांच्या निर्णयामुळे अनेक राजकीय नेत्यांच्या पोटात दुखणे सुरू झाले. यात महापालिकेतील सत्ताधारी भाजप तसेच विरोधी पक्ष कॉंग्रेसचेही नेते सामील आहे. या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीचा आग्रह धरला. त्यामुळे मुंबईपासून नागपूरपर्यंत आयुक्तांच्या बदलीची चर्चा रंगली आहे. राजकीय नेत्यांचा विरोध होत असला तरी आयुक्तांना नागरिकांचे मात्र मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे. 

आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयामुळे शहरात कोरोना नियंत्रणात असल्याची नागरिकांची भावना आहे. त्यांच्यामुळेच शहर सुरक्षित असल्याचेही अनेक नागरिक मानतात. एवढेच नव्हे तर सत्ताधाऱ्यांच्या मनमानीलाही लगाम त्यांनी लगाम लावली, असेही अनेकांचे मत आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विलगीकरण, प्रतिबंधित क्षेत्र घोषित करणे, त्यात घट करणे, कोविड सेंटर तयार करणे, राजकीय नेत्यांचा विरोध झुगारून प्रशासकीय यंत्रणेकडून उपाययोजना राबविण्याचे काम त्यांनी केले. यातूनच जनसामान्यात त्यांच्याबाबत आपुलकी निर्माण झाली. 

धंद्यावर बसवण्याची धमकी देणारी 'लुटेरी दुल्हन' प्रीती दास पोलिसांच्या जाळ्या

आयुक्तांच्या बदलीची चर्चा ऐकताच यातील काही नागरिकांनी 'नागपूर सिटी निड्‌स तुकाराम मुंढे' अशी मोहिम सोशल मिडियाच्या माध्यमातून सुरू केली. 'डब्लू डब्लू डब्लू डॉट चेंज डॉट ऑर्ग' या वेबसाईटच्या माध्यमातून 11 जूनला रात्रीपासून ही मोहिम सुरू केली. तासभरातच एक हजार नागरिकांनी आयुक्त मुंढेंच्या बदलीचा विरोध करीत या वेबसाईटवर नोंद केली. गेल्या तीन दिवसांत आज रात्रीपर्यंत 22 हजार 102 नागरिकांनी आयुक्त मुंढेंच्या समर्थनार्थ वेबसाईटवर नाव नोंदविले. 

नागपुरात मुंढेची गरज, मुख्यमंत्र्यांना पत्र 
गेल्या सहा महिन्यांत आयुक्त मुंढे यांनी शहराचा चेहरा बदलवला. कोरोना या साथीच्या रोगात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. अगदी कमी खर्चात विलगीकरण, मजूर व परप्रांतीय मजुरांसाठी निवारा, भिकाऱ्यांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम, शहराचे सर्वेक्षण यामुळे कोरोनावर नियंत्रण शक्‍य झाले. त्यामुळे आमचा त्यांच्यावर विश्‍वास असून अशा स्थितीत त्यांची बदली करू नये, असे ऑनलाईन पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात येणार आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: To prevent the replacement of Commissioner Munde Nagpurkar fought this battle