भाव टनाचा, पण मोजली जाते 11 क्विंटल मोसंबी! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 जानेवारी 2020

नरखेड तालुक्‍यात संत्रा लाभदायक ठरत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी संत्रापिकाला तिलांजली दिली. काही वर्षांपासून मोसंबी या पिकाकडे कल वाढला आहे. पण, तालुक्‍यात या फळाच्या विक्रीसाठी बाजार नसल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे फळ शेतातच कमी दरात हुंड्यात किंवा टनाने द्यावा लागते.

जलालखेडा (जि.नागपूर)  : शासकीय भावापेक्षा कमी भावाने शेतकऱ्यांचा माल खरेदी करू नये. असे केल्यास खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई होऊ शकते, असा शासनाचा कायदा असला, तरी आजपर्यंत याअंतर्गत कोणत्याच व्यापाऱ्यावर कारवाई झालेली नाही. इतकेच नव्हे, तर भाव एक टनाचा असला, तरी 11 क्विंटल फळे मोजली जातात. पैसे मात्र एका टनाचे म्हणजे 10 क्विंटलचेच दिले जातात. याविरोधात कोणताही नेता आवाज उठवत नाही, ही शोकांतिका आहे. कळमना बाजारात व्यापारी व दलालांकडून होणारी शेतकऱ्यांची लूट कोण थांबविणार, हा खरा प्रश्‍न आहे. 

 

क्‍लिक करा  : "ते' निघाले होते बाजाराला, रेल्वेने चिरडले त्यांना 

कळमना बाजारात व्यापारी, दलालांकडून शेतकऱ्यांची लूट 
नरखेड तालुक्‍यात संत्रा लाभदायक ठरत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी संत्रापिकाला तिलांजली दिली. काही वर्षांपासून मोसंबी या पिकाकडे कल वाढला आहे. पण, तालुक्‍यात या फळाच्या विक्रीसाठी बाजार नसल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे फळ शेतातच कमी दरात हुंड्यात किंवा टनाने द्यावा लागते. येथेही शेतकऱ्यांची लूट केली जाते. टनाचा भाव असला, तरी टनामागे एक क्विंटलची सूट घेतली जाते. आधीच कमी भाव मिळत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी त्यांचे फळ स्वतः तोडून नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कळमना बाजारपेठेत नेतात. जेणेकरून त्यांची लूट होणार नाही. पण येथेदेखील त्यांना लुबाडले जाते. शेतकऱ्यांना आधीच मोठे गाडीभाडे द्यावे लागते. माल बाजारपेठेत नेल्यानंतर फळाचा लिलाव टनाच्या भावाने केला जातो. पण, मोजल्यानंतर हिशेब करताना मात्र टनामागे सर्रास एक क्विंटल कपात करून शेतकऱ्यांना उर्वरित मालाची किमंत दिली जाते. इतकेच नव्हे, तर शेतकऱ्यांनी माल बाजारपेठेत नेल्यानंतर मालाचे ग्रेडिंग करण्यासाठी छटाई केली जाते. यासाठीही शेतकऱ्यांना दोनशे रुपये द्यावे लागतात. लहान मोसंबी वेगळी काढून कवडीमोल भावाने चिल्लर विक्री केली जाते. याचादेखील फटका बसतो. कळमना बाजारात ही पद्धत सुरू झाल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात येऊन व्यापारी ज्याप्रमाणे लुटतात, त्याचप्रमाणे बाजारातदेखील लुटले जात आहे. व्यापारी व दलालांवर बाजार समितीचे नियंत्रण नाही. बाजार समितीवर व्यापाऱ्यांचे वर्चस्व असल्याचे दिसत आहे. 
क्‍लिक करा   : तिन कार समोरासमोर धडकल्या, आठ जखमी 

 

रस्त्यावर उतरण्याचा इशारा 
कळमना बाजारपेठेत शेतकऱ्यांची लूट होत असल्याची माहिती खरी आहे. याचा मी स्वतःदेखील पीडित आहे. ही बाब अत्यंत चिंतेची आहे. शासनाकडून यावर नियंत्रण असणे आवश्‍यक आहे. शासनाचे पणन विभाग व सहकार विभाग बाजार समितीवर नियंत्रण ठेवण्यात कमी पडत असल्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांची लूट होत आहे. ही लूट थांबविण्यात यावी; अन्यथा शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा माजी सभापती वसंत चांडक यांनी दिला आहे. 

क्‍लिक करा  : विद्यार्थिनींहो बाहेर जाताय... निर्भया पथकाला माहिती द्या 

शेतकऱ्यांची लूट थांबावी 
नागपूर उत्पन्न बाजार समिती कळमनामध्ये मोसंबी विक्रीनंतर टनामागे आधी 50 किलो काट घेतला जात होता. आता तो 100 किलो घेतला जात आहे. म्हणजे, शेतकऱ्याने 5 टन मोसंबी विकली तर त्याला साडेचार टनाचेच पैसे मिळतात. हा काट कोणत्या नियमात बसतो, हे आजपर्यंत कळले नाही. म्हणजे, बाजार समिती शेतकरी सोडून व्यापाऱ्यांचे हित जपताना दिसत आहे. ही लूट थांबली पाहिजे. शेतकऱ्यांच्या मालास योग्य भाव मिळावा यावर बाजार समितीचे नियंत्रण असावे 
दिलीप काळमेघ 
शेतकरी 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The price is tons, but it counts 11 qt.