देव घडविणाऱ्या मूर्तीकारांच्या आयुष्यातील बघा किती हा अंधार 

मूर्तिकार
मूर्तिकार

नागपूर : मूर्तिकला ही अत्यंत अवघड साधना आहे. प्रत्येकाला ती जमतेच असे नाही. विशेष म्हणजे असंख्य लोक या साधनामार्गातील असतात पण त्यांच्यात ते कौशल्य कधीच निर्माण होत नाही. आजच्या घडीला दगडाला आकार देणारे बोटावर मोजण्याइतकेच मूर्तीकार शहरात आहेत. श्रावण अन्‌ भाद्रपद या दोन महिन्यांचा कालावधी अशा मूर्तीकारांसाठी सुवर्णकाळ असला तरी, यंदाची स्थिती जगा वेगळी आहे. त्यातच मालाची वाहतूक बंद असल्याने जयपूरहून येणारा दडगही शहरात पोहचलेला नाही. त्यामुळे ईश्‍वराला घडविणाऱ्या मूर्तीकारांचेच भविष्य अंधारात आहे. 

मूर्ती घडवण्याचे कौशल्य लाभण्यासही भाग्य लाभते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ते येड्या गबाळ्याचे काम नव्हे. त्यामुळे अशा प्रतिभावंत मूर्तीकारांची फार फार तर पंधराच्या आसपास कुटुंब नागपुरकार राहतात. तसा वर्षभर चालणारा हा व्यवसाय असला तरी, आषाढ, श्रावण व भाद्रपदात या व्यवसायाला उभारी येते. मधल्या काळात नागपूर महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने धार्मिक स्थळांवर हातोडा लगावला अन्‌ थोडी थोडके का होईना मात्र दगडी मूर्तीकारांच्या व्यवसायाला सुगीचे दिवस आलेत. मात्र लॉकडाऊनच्या कार्यकाळात हा व्यवसाय इतका संकटात सापडला आहे की, संपूर्ण वर्षभर मूर्तीकारांच्या कौशल्याची किंमत होईल अशी स्थिती सध्यातरी नाही. 

महालातील मॉडेल मीलजवळ काही मूर्तीकारांची अनेक वर्षांपासून दुकाने आहेत. विशेष म्हणजे मूर्तिकलेचा येथे वारसा चालतो आहे. हिंदू देवी देवतांच्या सुमारे सर्वच प्रकारच्या मूर्ती येथे उपलब्ध असून, श्रावणमासात महादेवाची पिंड विकत घेण्यास लोक येथे मोठी गर्दी करतात. 

गेल्या काही वर्षात इतर व्यवसायाप्रमाणे दगडी मूर्तीकारांच्या व्यवसायाला देखील उतरती कळा लागली आहे. आमच्या व्यवसाय बिनभरवशाचा असून, यंदा लॉकडाऊनमुळे चारही बाजूने व्यवसाय संकटात सापडला आहे. अशात पोट भरण्यासाठी काय करावे हे देखील सुचत नाही. 
भोले कुशवाह, दगडी मूर्तींचे शिल्पकार. 

दगडी मूर्तीकार जयपूरहून दगडाची आयात करीत असल्याचे येथील एका मूर्तीकाराने सांगितले. मात्र यंदा लॉकडाऊनमुळे वाहतुक पूर्णत: बंद आहे. त्यामुळे जयपूरहून दगड बोलविणे शक्‍य नसल्याचे सांगताना व्यवसायात यंदा प्रचंड मोठा तोटा झाल्याचे त्यांनी सांगितले. उपलब्ध असलेल्या काळ्या दगडात पिंडी घडविल्या मात्र दरवर्षी लागतात इतक्‍या पिंडी यंदा विकणे शक्‍य नसल्याचे मूर्तीकार म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com