इक रस्ता आहा आहा! चला राष्ट्रीय महामार्गांवर प्रवासाला

राजेश चरपे
Monday, 7 September 2020

आतापर्यंत महाराष्ट्रात ९ हजार २८१ किमी लांबीची कामे पूर्ण झाली असून ५ हजार २६० किमी लांबीमध्ये कामे सुरु आहेत. बांधकामे पूर्ण झालेल्या कामांमध्ये काँक्रीटचे राष्ट्रीय महामार्ग ३ हजार ४३३ किलोमीटर आहेत, तर उर्वरित कामे डांबरीकरणाची आहे. गेल्या सहा वर्षात राष्ट्रीय महामार्गांच्या कामासाठी ७०३८८ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

नागपूर : चांगले रस्ते हे देश विकासात महत्त्वाची भूमिका निभावतात. त्यामुळे देशाचा सर्वांगिण विकास व्हावा याद्ष्टीने प्रत्येक गाव आणि शहर एकमेकांशी जोडले जावे या उद्देशाने रस्ते बांधणीचा धडाका सुरू करण्यात आला आणि महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांची लांबी गेल्या सहा वर्षात तब्बल १२ हजार कीमीने वाढली आहे. ही लांबी जुलै-ऑगस्ट २०२० पर्यंत अधिक वाढून १७ हजार ७४९ किलोमीटरपर्यंत गेली. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे राष्ट्रीय महामार्गांच्या कामाची गती वाढली आहे. राज्यातील सर्व जिल्हे आता महामार्गांनी जोडले गेले आहेत.

राज्यात राष्ट्रीय महामार्गांच्या लांबीत सहा वर्षात एकूण २११ टक्के वाढ झाली आहे. गेल्या सहा वर्षाच्या काळात राष्ट्रीय महामार्गांची ५२० कामे मंजूर करण्यात आली असून या कामांची लांबी १४ हजार ४५० किलोमीटर आहे. या कामाची एकूण किंमत एक लाख २८ हजार ५३५ कोटी इतकी आहे. यापैकी ११०० किलोमीटरचे मार्ग हे सिमेंट काँक्रीटचे मंजूर करण्यात आले आहेत. सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यामुळे देखभाल दुरुस्तीच्या खर्चात मोठी बचत होणार आहे. दरवर्षी या रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करण्याची आवश्यकता राहणार नाही.

आतापर्यंत महाराष्ट्रात ९ हजार २८१ किमी लांबीची कामे पूर्ण झाली असून ५ हजार २६० किमी लांबीमध्ये कामे सुरु आहेत. बांधकामे पूर्ण झालेल्या कामांमध्ये काँक्रीटचे राष्ट्रीय महामार्ग ३ हजार ४३३ किलोमीटर आहेत, तर उर्वरित कामे डांबरीकरणाची आहे. गेल्या सहा वर्षात राष्ट्रीय महामार्गांच्या कामासाठी ७०३८८ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा -  कोरोनाबाधित पोलिसांच्या पाठीशी आता खुद्द नागपूरचे नवनियुक्त सीपी! वाचा काय केले वक्तव्य

सन २०२०-२१ चे नियोजन करताना या आर्थिक वर्षासाठी ३२३२ कोटी रुपयांचा वार्षिक आराखडा मंजूर करण्यात आला असून या कामांच्या सविस्तर प्रकल्प अहवालांना मंजुरी प्राप्त झाल्यानंतर ही कामे सुरु होणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राज्य बांधकाम विभागाअंतर्गत आतापर्यंत १४ कामांच्या निविदांना अंतिम स्वरूप देण्यात आले असून या कामांची लांबी ८७ किलोमीटर आहे. या कामांसाठी ५३२ कोटी रुपये खर्च येईल. पाच कामे निविदास्तरावर असून त्या कामांची किंमत २२१ कोटी रुपये आहे.

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Progress of National highway