संपूर्ण हॉटेल होते रिकामे, पण दोन खोल्यांमध्ये सुरू होता हा प्रकार

oyo hotel room
oyo hotel room

नागपूर : लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे प्रेमीयुगुलांची मोठी पंचाईत झाली आहे. भेटीगोटी होत नसल्यामुळे त्रस्त झालेल्या दोन प्रेमीयुगुलांनी बेलतरोडीतील वुहान ओयो हॉटेलमालकाला जास्त पैशाचे आमिष दिले. हॉटेलमालकाने दोन प्रेमी युगुलांना हॉटेलमधील दोन रूम उपलब्ध करून दिल्या. माहिती मिळताच बेलतरोडी पोलिसांनी छापा टाकून प्रेमी युगुलांना ताब्यात घेतले. तर हॉटेलमालकावर गुन्हा दाखल केला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेलतरोडीतील रेवतीनगरात बालाजी लॉन्समागे वुहान हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेमी युगुलांना रूम उपलब्ध करून देण्याचा गोरखधंदा सुरू होता. प्रेमी युगुलही शारीरिक संबंधासाठी केवळ तासभर रूम बुकिंगचे जवळपास पाच ते सात हजार रुपये हॉटेलमालकाला देत होते. गेल्या 24 मार्चपासून लॉकडाऊन आणि संचारबंदी असताना कुणालाही घराबाहेर पडण्यास मनाई आहे. तरीही युवान हॉटेलमध्ये संचारबंदी असतानाही युवक आणि युवतींची मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. ही बाब नागरिकांच्या लक्षात आल्याने बेलतरोडीचे ठाणेदार विजय आकोत यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार आकोत यांनी गेल्या आठ दिवसांपासून हॉटेलवर लक्ष ठेवले. येथे प्रेमी युगुलांना मौजमस्ती करण्यासाठी रूम उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे लक्षात आले. त्यानुसार सोमवारी सायंकाळी बेलतरोडी पोलिसांनी हॉटेलवर अचानक छापा घातला.

दोन प्रेमीयुगुल ताब्यात
हॉटेलमध्ये पोलिस येताच हॉटेलचा मालक आणि मॅनेजर चकित झाले. त्यांची पोलिसांची चौकशी केली. त्यांनी संपूर्ण हॉटेल रिकामे असल्याचे सांगितले. पोलिसांची खात्री न पटल्यामुळे त्यांनी बुकिंग रजिस्टर मागितले. त्यामध्ये दोन युवती आणि दोन युवकांची नोंद दिसली. त्याबाबत विचारपूस केली असताना हॉटेलचा मॅनेजर उडवाउडवीचे उत्तरे देत होता. संशय आल्याने पोलिसांनी हॉटेलमधील रूमची झडती घेणे सुरू केले. तर दोन रूममध्ये दोन प्रेमीयुगुल आक्षेपार्ह अवस्थेत पोलिसांना आढळले. त्यांनी लगेच चौघांनाही खाली आणले. त्यांची चौकशी करण्यात आली. त्यांनी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी रूम भाड्याने घेतल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी दोन्ही युवती आणि युवक यांच्यासह हॉटेलच्या मालक आणि व्यवस्थापकावर संचारबंदीचे उल्लंघन केल्याचा गुन्हा बेलतरोडी पोलिसांनी दाखल केला. 

हॉटेल-ढाब्यावर देहव्यापार 
संचारबंदीमुळे सर्वच हॉटेल आणि हायवे रोडवरील ढाबे बंद करण्यात आले आहेत. मात्र, ती कमाई बंद असल्यामुळे ढाबाचालकांनी वेगळ्याच कमाईकडे मोर्चा वळविला आहे. अनेक ढाब्यांमध्ये प्रेमीयुगुलांना प्रवेश देऊन देहव्यापार सुरू केला आहे. नागपूर शहरातील अनेक हॉटेल्समध्येसुद्धा प्रेमी युगुलांना जास्त पैसे घेऊन रात्रीच्या सुमारास मुक्‍कामी राहणे किंवा तासाभरासाठी बुक करून मौजमस्ती करण्याची मुभा देण्यात येत असल्याची माहिती आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com