रेल्वे"कोच' चे होणार कोरोनाबाधितांसाठी विलगीकरण कक्षात रुपांतर

Railway coach will be turned  to isolation ward for corona positive
Railway coach will be turned to isolation ward for corona positive
Updated on

नागपूर :  कोरोनाचा उद्रेक उपराजधानीत होऊ नये, या हेतूने महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सतरंजीपुरा या कोरोना हॉट-स्पॉटमधील शेकडो लोकांचे विलगीकरण केले आहे. मात्र हिंगणा, लोणारा, पाचपावली येथे तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षांमुळे जनमानसात भितीचे वातावरण पसरले. विलगीकरण हटवा यासाठी आंदोलने होऊ लागली आहेत, शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. यावर उपाय म्हणून लॉकडाऊनच्या काळात बंद असलेल्या रेल्वेगाड्या नागपुरच्या यार्डात उभ्या आहेत. या रेल्वेगाड्यांचे "कोच' आयसोलेशन हॉस्पिटल मध्ये रूपांतरित करणे हा पर्याय होऊ शकतो.

सध्या देशात लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे सर्व रेल्वे वाहतुक बंद आहे. देशातील पुर्व पासून तर दक्षिण, पश्‍चिम, मध्य अशा सर्व "झोन' रेल्वेगाड्या यार्डमध्ये आहेत. जनमानसात भितीचे वातावरण पसरू नये म्हणून कोरोना संशयित रुग्णांचे विलगीकरण करण्यासाठी "कोच ' ना ' आयसोलेशन वॉर्ड ' मध्ये सहज रुपांतरित करता येऊ शकते. यामुळे जनमानसात निर्माण झालेला तणाव निवळण्यास मदत होईल. लांब पल्ल्याच्या रेल्वेमध्ये "नॉन एसी' , एसी कोच आहेत. प्रत्येक कोचमध्ये आठ ते दहा भाग (कंपार्टमेंट) असतात. एका कंपार्टमेंटमध्ये सुरक्षित अंतर ठेवून "कोरोना'च्या रुग्णांना ठेवता येऊ शकते. नागपूर शहरात असलेल्या यार्डमध्ये सध्या किमान दहा ते बारा लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या उभ्या आहेत. प्रत्येक रेल्वेगाडीला किमान पंधरा ते वीस कोच असतात. एका कोचमध्ये किमान 20 संशयितांची सोय केली तर सहजपणे एका रेल्वेगाडीत दोनशे ते अडीचशे व्यक्ती विलगीकरणात राहू शकतात.

वैद्यकीय सोय पुरवावी

रेल्वे यार्डमध्ये उभ्या असलेल्या रेल्वेगाड्यांमध्ये "कोरोना संशयितांचे ' नमुने घेणे त्यांच्यावर नजर ठेवणे यासाठी डॉक्‍टर, परिचारिकांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांची तसेच लोहमार्ग पोलिस उपलब्ध होऊ शकतात. प्रायोगिक तत्त्वावर काही दिवस रेल्वेगाड्यांमध्ये "आयसोलेशन वॉर्ड 'चे ' मॉडेल ' तयार करणे सहज शक्‍य आहे. प्रत्येक केबिन, कंपार्टमेंटच्या बाहेर पडदे लावण्यात यावेत. आवश्‍यक वैद्यकीय उपकरणांसाठी रेल्वेतील किचनचा वापर सहज करता येतो.लोहमार्ग पोलिसांची नजरसद्या नागपुरात रेल्वे यार्डमध्ये उभ्या असलेल्या 10 ते 12 रेल्वेगाड्यांमध्ये "कोरोना संशयितांचे ' बाराशेपेक्षा अधिक रुग्ण ठेवता येऊ शकतात. त्यांचे नमुने घेण्यापासून तर त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी डॉक्‍टर, परिचारिकांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांची तसेच लोहमार्ग पोलिस सहज उपलब्ध होऊ शकतात. संशयित कोरोना रुग्णांच्या सोयीचे व्हावे यासाठी मिडल बर्थचा वापर करण्यात येऊ नये. प्रायोगिक तत्त्वावर काही दिवस रेल्वेगाड्यांचा "आयसोलेशन वॉर्ड 'चे ' मॉडेल ' तयार करणे सहज शक्‍य आहे. प्रत्येक केबिन, कंपार्टमेंटच्या बाहेर पडदे लावण्यात यावे. आवश्‍यक वैद्यकीय उपकरणांसाठी रेल्वेतील किचनचा वापर सहज करता येतो.

रेल्वे डबा विलगीकरण कक्ष
रेल्वे डब्यांमध्ये प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये एक रुग्ण ठेवता येऊ शकतो. यानुसार एका डब्यात सुमारे 20 संशयितांचे आयसोलेशन करता येते. शहरात विलगीकरणावरून आंदोलने होत आहेत. जनता भयभित आहे. अशावेळी यार्डमध्ये उभा असलेला रेल्वेचा डबा हा विलगीकरण कक्ष म्हणून सहज उपयोगात आणता येतो.
-त्रिशरण सहारे, इंटक, नागपूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com