खंडणी देण्यास विरोध केला म्हणून झाला "त्याचा' गेम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जून 2020

कांद्री येथील राजू कश्‍यप या 35 वर्षीय युवकाचा आरोपी बीरेंद्र जगतपाल चौहान आणि प्रदीप ठाकूर यांनी सोमवारी खून केला. पारशिवनी येथून स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारच्या रात्री आरोपींना अटक केली.

टेकाडी (जि. नागपूर) : सोमवारी कांद्री येथे राजू कश्‍यप या 35 वर्षीय युवकाचा सात जणांनी मिळून खून केला. या गुन्ह्यातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली. आणखी चार आरोपी पसार आहेत. पैशाच्या देवाणघेवाणीवरून ही हत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज होता. परंतु खंडणी मागितली अन्‌ ती देण्यास विरोध केला म्हणून राजू कश्‍यप या युवकाची हत्या झाल्याच्या सध्या परिसरात चर्चा आहे.

कांद्री येथील राजू कश्‍यप या 35 वर्षीय युवकाचा आरोपी बीरेंद्र जगतपाल चौहान आणि प्रदीप ठाकूर यांनी सोमवारी खून केला. पारशिवनी येथून स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारच्या रात्री आरोपींना अटक केली. गुन्ह्यातील आरोपी वीरेंद्र कल्लू नायक याला तत्काळ अटक केल्यानंतर सात आरोपींची नावे पुढे आली होती. सध्या हत्याकांडातील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, इतर चार आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. पैशांच्या देवाण-घेवाणीतून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज जरी असला तरी प्रकरण मात्र काही "और'च असल्याची चर्चा आहे.

नागपूरकर म्हणताहेत, तुकाराम मुंढे आगे बढो, हम तुम्हारे साथ है... सोशल मीडियावर धूम

आरोपी बिरेंद्र चौहान आपल्या गॅंगमधील सहकाऱ्यांच्या मदतीने परिसरातील अवैध व्यवसाय आणि व्यवसायिकांना धमकवून खंडणी गोळा करायचा. सोबतच टेकाडी कांद्री परिसरात आरोपी बिरेंद्र चौहान याच्या भावाचा जुगारअड्डयाचा अवैध व्यवसाय असल्याची चर्चा आहे. अशातच राजू कश्‍यप वेकोलिअंतर्गत खासगी कंत्राट कंपनीत सुपरवायजर म्हणून कामाला होता. कंपनीकडे आरोपी बिरेंद्र चौहान आणि वीरेंद्र कल्लू नायक खंडणी मागायला गेले असता, राजू कश्‍यप याने त्यांचा विरोध केला.

त्यानंतर आरोपीकडून राजेशला अनेकदा धमकी देण्यात येत होती. आठवडाभरात वाढलेला वाद विकोपाला गेला आणि सोमवार रात्री कामावरून परत येताना कांद्री शिवारात असलेल्या इंडियन बॅंक ऑफ इंडियानजीक राजू कश्‍यपला सात आरोपींनी घेराव करून चाकूचे वार करून ठार केले. राजेशसोबत असलेल्या मित्राला जखमी करून पसार झाले होते. घटनेच्या काही तासांतच आरोपी बीरेंद्र जगतपाल चौहान, वीरेंद्र कल्लू नायक, प्रदीप ठाकूर यांना अटक केली.

घटनेतील मुख्य आरोपीचा भाऊ रघवेंद्र जगतपाल चौहान आणि सूरज चौहान पसार आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून शोध सुरू आहे. बुधवारी अटकेतील आरोपी बिरेंद्र चौहान व वीरेंद्र नायक याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना दोन दिवसांची कोठडी देण्यात आली.

 

अवैध धंदे सुरूच

हत्या करून सातही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले असले तरी दोन एक तास आरोपींनी परिसर सोडला नव्हता. घटनेनंतर मुख्य आरोपी बिरेंद्र चौहान याने गोंडेगाव शिवारातील अवैध कोळसा टाल आणि खदान परिसरातील अवैध जुगारअड्डयावर जाऊन खंडणी मागितली आणि पारशिवनी येथे जाऊन लपला होता. दुसरा आरोपी रघवेंद्र जगतपाल चौहान घटनेनंतर तासभर कन्हान तारसा चौक परिसरात असल्याचे पोलिस तपासांत पुढे आले. सध्या पोलिसांनी आरोपी रघवेंद्र याच्या तांत्रिक पद्धतीने शोध सुरू केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raju's murder as opposed to paying ransom