बापलेकीच्या पवित्र नात्यालाच त्याने फासला काळिमा...केले हे कृत्य

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

1 एप्रिल 2020 ला आरोपीने दुपारी 2 वाजता पीडितेवर पुन्हा बलात्कार केला. तिने आपल्या आईला सांगितले असता आरोपीने दोघींनाही मारहाण केली. त्यानंतर पीडितेने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

नागपूर : नराधम बापाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी ही धक्‍कादायक घटना जरीपटका परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी नराधम बापावर गुन्हा दाखल करून अटक केली. दीपक (53, जरीपटका) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी श्‍वेता (बदललेले नाव) 17 वर्षांची आहे. ती चार वर्षांची असताना तिचे वडील तिला व तिच्या आईला सोडून गेले. दरम्यान, पती नसल्याने तिच्या आईकडे अनेक जण वाईट नजरने पहायचे. आरोपी दीपकने तिच्याशी जवळीक साधली. तिला वेळोवेळी मदत केली. दोघांचे सूत जुळले. काही वर्षांपूर्वी श्‍वेताच्या आईने दीपकशी दुसरा विवाह केला. आई मजुरीचे काम करते. श्‍वेता 13 वर्षांची असताना 2016 मध्ये तिची आई गावी गेली असताना आरोपीने तिच्याशी अश्‍लील कृत्य केले होते. कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. यानंतर त्याचे चाळे सुरूच होते. श्‍वेता 14 वर्षांची असताना घरी कुणी नसल्याची संधी साधून आरोपीने तिच्या तोंडात कापड कोंबून बलात्कार केला. याबाबत वाच्यता केल्यास आईला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर ती व तिची आई दुसरीकडे भाड्याने राहू लागले. दरम्यान, आरोपीने माफी मागून पुन्हा अशी चूक होणार नाही, अशी ग्वाही दिली. त्यामुळे आईने मुलीची समजूत घातली व पुन्हा आरोपीच्या घरी राहण्यासाठी आले. यानंतर 1 सप्टेंबर 2019 ला आई कामावर गेली असताना आरोपीने तिच्या बलात्कार केला. त्यानंतर त्या दोघी मामाकडे रहायला गेल्या. मामाने आरोपीला समजावून दोघींना परत पाठवले. 1 एप्रिल 2020 ला आरोपीने दुपारी 2 वाजता पीडितेवर पुन्हा बलात्कार केला. तिने आपल्या आईला सांगितले असता आरोपीने दोघींनाही मारहाण केली. त्यानंतर पीडितेने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

सविस्तर वाचा - कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण म्हणतो मला बळजबरीने पकडून ठेवले आहे, सोशल मीडियावर केला व्हिडिओ व्हायरल

पॉर्न व्हिडिओ दाखवून अत्याचार
पीडित श्‍वेता केवळ 14 वर्षांची असतानाच दीपक तिला पॉर्न व्हिडिओ दाखवत होता. तो विकृत मानसिकतेतून तिच्यावर बलात्कार करीत होता. जवळपास पाच ते सहा वर्षे पीडित मुलीचे लैंगिक शोषण करण्यात आले.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rape on daughter by step father