वाचा विज्ञानाची कमाल, चिरा न देताच हृदय शस्त्रक्रिया

Read more of science, heart surgery without cracks
Read more of science, heart surgery without cracks

नागपूर : जगभरात 100 पैकी किमान 25 ते 30 मृत्यू हृदयविकाराचे असतात. बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकार वाढत असतानाच हृदयविकारावरील उपचार पद्धतीचे नवे पर्व सुरू झाले आहे. पूर्वी शरीराला छेद देऊनच झडप बदलावी लागत असे. ही पारंपरिक पद्धत कालबाह्य झाली असून सत्तरीच्या उंबरठ्यावरील एका रुग्णाच्या शरिराला चिरा न देता हृदयातील झडपांचे दुसऱ्यांदा प्रत्यारोपण करून त्या रुग्णाचा जीव वाचवण्यात डॉक्‍टरांना यश आले. मोरेश्‍वर भावे यांच्यावर ही शस्त्रक्रिया न्यू इरा हॉस्पिटलमध्ये करण्यात आली.

आठ वर्षांपूर्वी मोरेश्वर भावे या 70 वर्षीय रुग्णाच्या हृदयावर बायपास हार्ट सर्जरी करण्यात आली. नैसर्गिकऐवजी कृत्रिम झडपेचे प्रत्यारोपण त्यावेळी करण्यात आले होते. गुरुवारी (ता. 20) हृदयाची झडप बदलण्यासाठी विनाछेद शस्त्रक्रिया करण्याचे तंत्र वापरताना हृदयातील रक्तधमन्यातील अडथळे दूर करण्यासाठी अँजिओप्लास्टीचा आधार घेण्यात आला. मांडीतून टाकलेल्या दुर्बीणीद्वारे ही झडप प्रत्यारोपित करण्यात आली. विशेष असे की, ती झडप खराब झाल्याने हा रुग्ण मृत्यूच्या दारात उभा होता. आधुनिक तंत्राचा आधार घेऊन रुग्णाच्या हृदयातील कृत्रिम झडपदेखील पुन्हा प्रत्यारोपित करण्यात आली. न्यू इरातील हृदयरोग शल्यचिकित्सक डॉ. निधीश मिश्रा यांच्या नेतृत्वात डॉ. नीलेश अग्रवाल, डॉ. महेंद्र म्हस्के, डॉ. सुंबूल सिद्धिकी, डॉ. साहिल बन्सल, न्यू इरा रुग्णालयातील हृदय प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. आनंद संचेती यांच्या वैद्यकीय पथकाने ही "व्हॉल्व्ह प्रत्यारोपणा'ची शल्यक्रिया यशस्वी केली.

देशातील तिसरी झडप

देशात आतापर्यंत अशा प्रकारच्या दोन झडप प्रत्यारोपित झाल्या होत्या. त्यात आता नागपूरने तिसऱ्या झडप प्रत्यारोपणाची भर घातली आहे. हृदय शरीराचा मोटरपंप असून हृदयाची क्षमता कमी झाल्यानंतर आवश्‍यक तेवढे रक्त पंप करू शकत नाही. हृदयात चार कप्पे असतात. त्यातील दोन उजव्या आणि दोन डाव्या बाजूला असतात. त्यामुळे जेव्हा उजव्या बाजूचे कप्पे निकामी होतात तेव्हा उजव्या बाजूचे तर डाव्या बाजूचे कप्पे निकामी होतात, तेव्हा डाव्या बाजूचे हृदय निकामी झाले, असे म्हणतात. हृदयातील स्नायूंची आकुंचन आणि प्रसरण पावत असतात. त्यामुळे जेव्हा स्नायू आकुंचित होण्याला अडथळा होतो, तेव्हा त्याला सिस्टॉलिक फेल्युअर म्हटले जाते. जेव्हा स्नायू प्रसरण पावण्याला अडथळा होतो, तेव्हा त्याला डायास्टॉलिक फेल्युअर म्हणतात, यामुळे झडप प्रत्यारोपित करावी लागते, असे डॉ. आनंद संचेती म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com