लॉकडाउनदरम्यान घरांमध्येही फिजिकल डिस्टन्सिंग, सोनोग्राफी चाचण्यांमध्ये घट

reduction in sonography testing during lockdown
reduction in sonography testing during lockdown

नागपूर : कोरोनामुळे ‘फिजिकल डिस्टन्सिंग' शब्द घराघरांत पोहोचला. घरांमध्ये या शब्दाचा जसाचा तसा अर्थ घेतल्याचे मागील वर्षी व यंदाच्या सोनोग्राफीच्या तुलनात्मक आकडेवारीवरून दिसून येते. लॉकडाउनच्या काळानंतर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोनोग्राफी चाचणीत ३० ते ५० टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून येते.

मार्चपासून देशात कोरोनाने थैमान घातले. परिणामी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्चला पहिल्या २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली. १५ एप्रिलपर्यंत घरातून कुणीही बाहेर पडू नये, असे आवाहन त्यांनी केले आणि संपूर्ण देश घरांमध्येच ‘लॉक' झाला. यात नंतर वाढ होत गेली. जूनपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात आली. दरम्यानच्या काळात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात दोन व्यक्तीमधील सुरक्षित अंतरासाठी सोशल डिस्टन्सिंगऐवजी फिजिकल डिस्टन्सिंग शब्द वापरण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केले. कोरोनाचे संक्रमण होणार नाही एवढे अंतर संशयित अन् इतरांमध्ये असावे, असा फिजिकल डिस्टन्सिंगचा अर्थ.

घरात अनेक दिवस कैद राहिल्याने डिसेंबरमध्ये मोठ्या संख्येने बाळ जन्म घेतील, अशा आशयाचे जोक्स, मिम्स तयार झाले होते. सोशल मीडियावर त्याचा धूमाकूळ होता. परंतु वास्तविकता वेगळी असल्याचे दिसून येते. गेल्या वर्षी करण्यात आलेली सोनोग्राफी चाचणी व यंदा करण्यात आलेल्या सोनोग्राफी चाचण्यांची आकडेवारी बघता घरांमध्ये ‘फिजिकल डिस्टन्सिंग'चा जसाचा तसा अर्थ घेतल्याचे दिसून येते.

यंदा २०२० मध्ये जानेवारी, फेब्रुवारी व जून महिन्यांचा अपवाद वगळता मागील वर्षीच्या तुलनेत इतर महिन्यांत गरोदरपणात सोनोग्राफी करणाऱ्यांच्या घट झाली आहे. यंदा मार्च, एप्रिल, मेमध्ये जवळपास ३० टक्क्यांनी सोनोग्राफी चाचणीत घट झाली. जूनमध्ये लॉकडाऊन मागे घेताच मागील वर्षी जूनच्या तुलनेत सोनोग्राफी करणाऱ्यांची संख्या ३९८ ने वाढली. जुलै ते ऑक्टोबरपर्यंत ३० ते ५० टक्क्यांपर्यंत सोनोग्राफी करणाऱ्यांत घट झाली.

गर्भधारणा व्यवस्थित झाली की नाही, बाळाची वाढ कशी होत आहे? याची अचूक उत्तरे सोनोग्राफी चाचणीतून मिळतात. एकापेक्षा जास्त गर्भ असण्याची शक्यता पडताळून पाहता येते, त्यानुसार गरोदरपणात काळजी घेणे शक्य होते. त्यामुळे पहिली सोनोग्राफी चाचणी आवश्यक असते व ती गर्भ राहिल्यानंतर आठ आठववड्यात केली जाते.

 
कोरोनाकाळात व मागील वर्षी झालेली सोनोग्राफी चाचणी

  • महिना २०१९ २०२०
  • मार्च १५,५०० १०,३७०
  • एप्रिल १७,४८१ १०,८५१
  • मे १५,९४३ १०,२१०
  • जून १४,८९२ १५,२९०
  • जुलै १५,०१३ १०,५०८
  • ऑगस्ट १७,२५८ ८,६१९
  • सप्टेंबर १३,४५७ १०,१५६
  • ऑक्टोबर १४,३४४ १०,६६३ 

संपादन : अतुल मांगे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com