
नागपूर: हॉस्पिटलमधील मृतदेह ताब्यात देण्यावरून कामठी मार्गावरील होप हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी नातेवाईकांशी अरेरावी केली. त्यामुळे चिडलेल्या नातेवाइकांनी गोंधळ घालून डॉक्टरसह दोघांना मारहाण केली. त्याचप्रमाणे दवाखान्यातील काउंटरची जाळपोळ करून काचा देखील फोडल्या. शनिवारी दुपारी ३.३० च्या सुमारास ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार दिवसांपूर्वी पिवळी नदी येथे राहणाऱ्या सुनीता पाली या महिलेची प्रकृती बिघडली होती. तिला होप हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले होते. तिची तपासणी केली असता ती कोरोनाबाधित असल्याचे लक्षात आले. सुनीतावर उपचार सुरू असतानाच शनिवारी सकाळी १०.३०च्या सुमारास तिचा मृत्यू झाला.
सुनीता ही कोरोनाबाधित असल्याने नियमाप्रमाणे मनपा कर्मचाऱ्यांना कळविणे आवश्यक होते. त्यानुसार होपचे संचालक डॉ. बी. के. मुरली यांनी मनपाला कळविले. परंतु, मनपाचे कर्मचारी वेळेवर आले नाहीत. दुपारी तीन वाजेपर्यंत मनपाचे कर्मचारी आले नव्हते. त्यामुळे सुनीताचे नातेवाईक संतप्त झाले. नातेवाइकांनी डॉ. मुरली यांना मृतदेह मागितला. परंतु, डॉ. मुरली यांनी मृतदेह देण्यास नकार दिला. तसेच अरेरावी करीत स्टाफला बोलावून दमदाटी करण्याची प्रयत्न केला. त्यामुळे नातेवाईक आणखीच संतप्त झाले.
त्यांनी हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालायला सुरवात केली. डॉ. मुरली यांनी मोठमोठ्यांनी आरडाओरड करीत धमकी देण्याचा प्रयत्न केल्यामुळे नातेवाइकांनी डॉ. मुरली यांची कॉलर पकडून मारहाण केली. एक कर्मचारी डॉ. मुरली यांच्या मदतीला धावत शिवीगाळ करायल लागल्याने त्यालाही मारहाण करण्यात आली.
या घटनेनंतर संतप्त नातेवाइकांनी हॉस्पिटलच्या काऊंटरवर दगडफेक करून जाळपोळ केली. हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. पाचपावलीचे पोलिस निरीक्षक किशोर नगराळे यांनी वेळीच धाव घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून ओमप्रकाश शाहूसह ९ जणांना अटक केली.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.