वाॅट्स अॅप ग्रुपमधून काढल्याचा राग, ॲडमिनवर प्राणघातक हल्ला

अनिल कांबळे
Monday, 26 October 2020

सुनील करमचंद अलीमचंदानी (मेश्राम पुतळा चौक, सदर) आणि आरोपी चंद्रमणी यादव हे दोघेही महापालिकेत कंत्राटदार आहेत. सुनील अलीमचंदानी यांनी दोन वॉट्स्ॲप ग्रुप तयार केले. या ग्रुपमध्ये आरोपी चंद्रमणी यादव आणि छत्रपती यादव हे दोघेही सदस्य होते.

नागपूर ः वॉट्सॲप ग्रुपमध्ये कमेंट केल्यानंतर दोन सदस्यांना ॲडमिनने ग्रुपमधून काढून टाकले. त्याचा राग आल्यामुळे दोन्ही सदस्यांनी ॲडमिनवर छन्नीने प्राणघातक हल्ला करीत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आरोपी सदस्यांवर सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. चंद्रमणी यादव (५०, सिंधी कॉलनी, वैशालीनगर) आणि छत्रपती यादव (४९) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनील करमचंद अलीमचंदानी (मेश्राम पुतळा चौक, सदर) आणि आरोपी चंद्रमणी यादव हे दोघेही महापालिकेत कंत्राटदार आहेत. सुनील अलीमचंदानी यांनी दोन वॉट्स्ॲप ग्रुप तयार केले. या ग्रुपमध्ये आरोपी चंद्रमणी यादव आणि छत्रपती यादव हे दोघेही सदस्य होते. या ग्रुपमध्ये तीन दिवसांपूर्वी काही एसएमएस टाकले. 

त्यामुळे ग्रूपमध्ये काही जणांनी आक्षेप घेतले. त्यावर अनेकांनी प्रत्युत्तर दिले. त्यामुळे सुनील यांनी दोघांनाही दोन्ही वॉट्सॲप ग्रुपमधून काढून टाकले. त्यामुळे दोघेही आरोपी चिडले होते. त्यांना रागाच्या भरात सुनील यांना फोन करून शिवीगाळ केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. 

क्लिक करा - ह्रदयद्रावक घटना: 15 ते 20 कुत्र्यांनी नऊ वर्षांच्या मुलाचे तोडले लचके, मूलाचा मृत्यू
 

शुक्रवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास चंद्रमणी आणि छत्रपती यांनी सुनील यांना फोन करून महापालिकेच्या कार्यलयाजवळ बोलावले. त्यांना ग्रूपमधून काढून टाकल्याच्या कारणावरून वाद घातला. त्यानंतर खुर्ची आणि छन्नीने सुनील यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. डोक्यात छन्नीचा घाव लागल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या सुनील यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला. दोन्ही आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

नोकराने केली चोरी

बोले पेट्रोल पंपाजवळील अवतार मेहरबाबा कॉम्प्लेक्समधील नोमेड्स हॉलिडेच्या कार्यालयातून नोकराने ६५ हजार रुपयांची रोख लंपास केली. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी प्रेषक अशोक वानखेडे (वय ३८, रा. चक्रपाणीनगर) याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला. सुदीप विजयकुमार अग्रवाल (वय ३९, रा. वृंदावन अपार्टमेंट, हिस्लॉप कॉलेजजवळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. 

संपादन  : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: removed from WhatsApp group, attempted murder of one