लाखो रुपयांचे धानपीक खराब, कारण काय तर बोगस बियाणे

टेकाडीः अवकाळी निसेवलेला धान दाखविताना शेतकरी.
टेकाडीः अवकाळी निसेवलेला धान दाखविताना शेतकरी.

टेकाडी/कन्हान (जि.नागपूर): पारशिवनी तालुक्याचे मुख्य पीक धान आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांनी विविध केंद्रातून धान बियाणे विकत घेतले. पऱ्हे टाकून लागवड केली. एकरी २० ते २५ हजार रुपये खर्च केला. यात अनेक जण कर्जबाजारी झाले. मात्र धानपीक चांगले येईल, कर्ज फिटेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. परंतू वेळेच्या आत धान निसवण्याला सुरवात झाल्याने फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले.

अधिक वाचाः आरोग्यमंत्री महोदय, नाही बेड; नाही खासगीत उपचाराची क्षमता, आता तुम्हीच बघा...

निघाले दुसरेच धान
शेतकऱ्यांनी पदरमोड करत विकत घेतलेले धानाचे बियाणे बोगस निघत असल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. जून महिन्यात रोवणे झालेल्या धानाला आता ओफळ ओंब्या लागत आहेत. शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली असून याबाबत कृषी अधिकाऱ्यांसह पालकत्र्यांकडे शेतकऱ्यांनी तक्रारीचे निवेदन सादर केले आहे. तालुक्यातील निलज या गावातील शेतकऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे स्थानीय बिज भंडार येथून हैदराबाद येथील धान बियाणे खरेदी करून परंपरागत पद्धतीने लागवट केली. परंतू धान निसवण्याला आणखी दोन एक महिना शिल्लक असताना वेळेच्या आधीच धनापिकातून वेगळ्याच प्रजातीचे धान निसवण्याला सुरवात झाल्याने शेतकरी तूर्तास गोंधळला आहे.

अधिक वाचाः शिक्षकांनी ‘ऐकावे तरी कोणाचे’, करावे कुणाच्या मनाचे?

गुन्हा दाखल करण्याची मागणी
 घडलेल्या प्रकारचे गाऱ्हाणे घेऊन शेतकरी संजय सत्येकार यांच्याकडे धाव घेऊन आपली फसवणूक झाल्याची आपबीती शेतकऱ्यांनी त्यांच्या समक्ष मांडली. सत्येकार यांनी बीजभंडार दुकान संचालकांमार्फत संबंधित बीज कंपनीला घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. तरी शेतकऱ्यांच्या नुकसानीची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. सोबत संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीदेखील बनवाबनवीची उत्तरे देत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. शेतकरी नेते संजय सत्येकार यांनी अखेर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. सर्वे करून नुकसानी संदर्भात संबंधित कंपनीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून कार्यवाही करण्याची मागणी आणि शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी करत शेतकऱ्यांची फसवणूक केलेल्या कंपनीवर कारवाही करण्याचे निवेदन पालकमंत्र्यासह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले. संजय सत्येकार, केशव चकोले, भाऊराव चकोले, रामकृष्णा चकोले, मिताराम चकोले, सीताराम चकोले या शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

संपादनः विजयकुमार राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com