esakal | मोठी बातमी! नागपुरात पुढचे दोन दिवस कोरोनाची RT-PCR चाचणी बंद; या पद्धतीनं होणार चाचण्या 
sakal

बोलून बातमी शोधा

नेक लसीकरण केंद्रांवर नागरिक आले. परंतु त्यांना निराश होऊन परत जावे लागले. आता आरटीपीसीआर चाचणीही दोन दिवस बंद राहणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

नेक लसीकरण केंद्रांवर नागरिक आले. परंतु त्यांना निराश होऊन परत जावे लागले. आता आरटीपीसीआर चाचणीही दोन दिवस बंद राहणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

मोठी बातमी! नागपुरात पुढचे दोन दिवस कोरोनाची RT-PCR चाचणी बंद; या पद्धतीनं होणार चाचण्या 

sakal_logo
By
राजेश प्रायकर

नागपूर ः शहरातील कोविशिल्ड लसीचा साठाही संपुष्टात आला असून महापालिकेचे अनेक लसीकरण केंद्र आज बंद पडल्याचे दिसून आले. अनेक लसीकरण केंद्रांवर नागरिक आले. परंतु त्यांना निराश होऊन परत जावे लागले. आता आरटीपीसीआर चाचणीही दोन दिवस बंद राहणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. नागरिकांना ॲंटीजेन टेस्ट कराव्या लागणार आहे. लस कधीपर्यंत उपलब्ध होणार याबाबतही काहीही स्पष्ट नसल्याने नागरिकांना, विशेषतः दुसरा डोज घेण्याऱ्यांची निराशा होणार आहे.

नागपूर जिल्हा परिषदेत कचरागाडी खरेदीवरून पदाधिकाऱ्यांमध्ये वाद; राजकारणासोबतच 'अर्थकारण...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ ते १४ एप्रिलपर्यंत लस उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. परंतु आज पहिल्याच दिवशी लसीचा साठा संपुष्टात आल्याने उत्सवावर विरजण पडले. शहरातील सर्वाधिक लसीकऱणाची नोंद होणाऱ्या गांधीनगरातील इंदिरा गांधी रुग्णालय, सुभेदार ले-आऊट येथील दुर्गानगर प्राथमिक शाळेसह अनेक भागातील लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. 

महापालिकेने लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी शहराच्या समाजभवन, शाळांमध्ये केंद्र सुरू केले. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लस घेतली. परंतु आज महापालिकेचे सर्वच लसीकरण केंद्र बंद आढळून आले. त्यामुळे लसीकरण मोहिमेलाही ‘ब्रेक' लागला. अनेक नागरिकांनी याबाबत पूर्वकल्पना दिली नसल्याने लसीकऱण केंद्रांवरच नाराजी व्यक्त केली. दरम्यान, तांत्रिक कारणामुळे आरटीपीसीआर चाचणीही १२ व १४ एप्रिलला बंद करण्यात आली आहे. गुढीपाडव्यालाही चाचणी केंद्र बंद राहणार आहे. नागरिकांना ४२ शासकीय चाचणी केंद्रावरून केवळ 'रॅपिड अँटीजेन टेस्ट' करता येईल, अशी माहिती मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली.

गरज पडल्यास आरटीपीसीआर चाचणी

लक्षणे असूनही रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये येणाऱ्या व्यक्तीच्या आरटीपीसीआर चाचणीची विशेष व्यवस्था करण्यात येईल. अँटीजेन टेस्टचे प्राप्त अहवाल त्याच वेळी आयसीएमआर पोर्टलवर अपलोड करण्याचे निर्देशही मनपा आयुक्तांनी संबंधित कर्मचाऱ्यांना दिले.

चंद्रपूर जिल्ह्यात आरटीपीसीआर तपासण्या वाढवा; केंद्रीय आरोग्य पथकाचे निर्देश

बॅकलॉग भरून काढण्यासाठी RTPCR बंद 

सध्या चाचण्यांची संख्या वाढल्याने परीक्षण करणाऱ्या मेडिकल, मेयो, एम्स, आरटीएमएनयू येथील प्रयोगशाळांवरील भार वाढला आहे. त्यामुळे चाचणी अहवाल प्राप्त होण्यास दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागत आहे. प्रयोगशाळांकडे असलेला बॅकलॉग भरून काढण्यासाठी ॲंटीजेन टेस्ट करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

go to top