मॅरेज ऍनिव्हर्सरीला वैयक्तिक आनंदाचा त्याग, वाचा खऱ्या कोव्हिड योद्‌ध्याची कथा

मंगेश गोमासे
शनिवार, 20 जून 2020

डॉ. नरेंद्र आणि डॉ. स्नेहल नौकरकर हे खरेखुरे कोविड योद्धा. सकाळपासून रुग्णालयात गेल्यावर केव्हा परत यायचे याचा वेळ त्यांना माहिती नाही. दोन वर्षांपूर्वी नरेंद्र आणि स्नेहल यांच्या लग्नाची गाठ बांधल्या गेली. गुरुवारी (ता.18) त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस. लग्नाचा वाढदिवस असल्यावर अनेकजन सुटी टाकून तो "सेलिब्रेट' कसा करायचा याचे प्लॅनिंग करुन ठेवताना दिसतात.

नागपूर : कोविड रुग्णांच्या जीवनाची घडी निट बसावी म्हणून नागपुरातील कोविड योद्धा असलेल्या एका डॉक्‍टर दाम्पत्याने आपल्या सहजीवनातील काही अविस्मरणीय क्षणांचेही समर्पण केले आहे. एकीकडे मातृसेवा संघ रूग्णालयाच्या डॉ. स्नेहल नौकरकर यांनी कोरोनाबाधीत महिलेची सुखरूप प्रसुती केली. त्यांना क्वारंटाईन व्हावे लागले. दूसरीकडे डागा रुग्णालयाचे डॉ. नरेंद्र नौकरकर रुग्णांच्या सेवेत व्यस्त आहेत. अगदी "मॅरेज ऍनिव्हर्सरी'च्या दिवशीही वैयक्तिक आनंदाचा त्याग करुन त्यांनी कर्तव्याला महत्व दिले.

डॉ. नरेंद्र आणि डॉ. स्नेहल नौकरकर हे खरेखुरे कोविड योद्धा. सकाळपासून रुग्णालयात गेल्यावर केव्हा परत यायचे याचा वेळ त्यांना माहिती नाही. दोन वर्षांपूर्वी नरेंद्र आणि स्नेहल यांच्या लग्नाची गाठ बांधल्या गेली. गुरुवारी (ता.18) त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस. लग्नाचा वाढदिवस असल्यावर अनेकजन सुटी टाकून तो "सेलिब्रेट' कसा करायचा याचे प्लॅनिंग करुन ठेवताना दिसतात.

 केव्हा होणार आरटीईचे प्रवेश....वाचा

मात्र, यावेळी एकीकडे डॉ. नरेंद्र नौकरकर डागा रुग्णालयात रुग्णांची सेवा तर सोमवारी मातृसेवा संघ रूग्णालयाच्या डॉ. स्नेहल नौकरकर यांनी कोरोनाबाधीत महिलेची सुखरूप प्रसुती पार पाडल्याने कोरंटाईन झाल्यात. विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यांपासून डॉ. नरेंद्र रूग्णांच्या सेवेत आहेत. याशिवाय डॉ. स्नेहलही मातृसेवा संघात आपली सेवा देत आहेत. त्यामुळे कधी-कधी दोघांनाही एकमेकांशी भेटणे वा बोलणे कठीण होते हे विशेष.

"व्हिडिओ कॉल'द्वारे संवाद
रुग्णांच्या सेवेत असलेले डॉ. नरेंद्र हे सवड मिळताच, डॉ. स्नेहल यांचेशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधतात. अगदी "मॅरेज ऍनिव्हर्सरी'च्या दिवशीही त्यांनी एकमेकांना शुभेच्छा देत, सवांद साधला. एकमेकांशी मन जुळलेल्या या दाम्पत्यांना जवळ आणण्याचे काम तंत्रज्ञानाने केल्याने त्यातून होणारा संवादही अगदी त्यांच्या आयुष्यभराचे नाते घट्ट करण्यासाठी पुरेसा आहे हेही तेवढेच खरे.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sacrifice of personal happiness to marriage anniversary