पावसाळा सुरू झालाय... तुम्हाला माहिती आहे का? कोणता पाऊस मानला जातो हानीकारक

The Seasons Change, The Constellations Become Irregular
The Seasons Change, The Constellations Become Irregular

नागपूर :  जंगल तोड, प्रदूषण, तापमान वाढ आणि हवामान बदलामुळे ऋतूचक्रात बदल झाला आहे. अनेक वर्षापासून पावसाची नक्षत्रे नियमित येत होती. गेल्या 25 वर्षापासून सातत्याने नक्षत्रामध्ये अनियमितता आल्याचे पहायला मिळत आहे. जून, जुलै महिन्यात विजा न कडाडता, संथ आणि सातत्याने पाऊस येत असे, आता पाऊस येतो तो विजांचा गडगडाट, वादळी आणि अतिवृष्टी करीत. पर्यावरणाच्या झालेल्या हानीमुळे हे चक्र आता पुढेही असेच राहण्याची शक्‍यता आहे असे पर्यावरण अभ्यासकांचे म्हणणे आहे.

नक्षत्रांविना माणसाच्या, प्राणी-पशुपक्ष्यांच्या जीवनाला काहीच अर्थ उरत नाही. त्यामुळे मानवी जीवनात पावसाच्या नऊ नक्षत्रांचे महत्त्व आहे. हे नक्षत्रांचे देणे आहे. विविध रूपात ही नक्षत्रे येतात. वाहनांच्या स्वरूपात त्यांची नावे पाहता, पावसाच रूप कधी सौम्य तर कधी उग्र असा अनुभव देत राहत. मृग नक्षत्र, आद्र नक्षत्र, पुनर्वसू, उत्तरा नक्षत्र, पुष्य नक्षत्र, आश्‍लेषा नक्षत्र, मघा, पूर्वा नक्षत्र, उत्तरा नक्षत्र, हस्त नक्षत्र आदी सत्तावीस नक्षत्रांपैकी लाभलेल हे नऊ नक्षत्रांच देण पावसाची अनेक रूपे उलगडत जातात. 

जाणून घ्या - मुलांच्या हट्टापोटी वडिलांनी घेतला स्मार्टफोन, बहीण-भाऊ दोघेही खूश; मात्र, आईने मध्यस्ती केल्याने मुलीची आत्महत्या
पहिले नक्षत्र म्हणजे "मृग नक्षत्र' सूर्याचा सात जून रोजीचा मृग नक्षत्र म्हणजे पावसास प्रारंभ. आतुरतेने पावसाची वाट पाहणाऱ्या माणसाला, शेतकऱ्यांना हे मृग नक्षत्र नकळतच दिलासा देऊन जात. मृग नक्षत्रांपासून ओषा नक्षत्रांपर्यंत पडणारा पाऊस हा बहारदार असतो. निसर्गाला खऱ्या अर्थाने यावेळी बहर येतो. धरणी हिरवीगार होऊन शेती डोलू लागलेली असते.

आषाढ-श्रावणातील रिमझिम झेलण्यासाठी आतुर झालेली मन यावेळी ऊन-पावसाचा खेळही खऱ्या अर्थाने अनुभवताना दिसतात. ओषा नक्षत्रात सळसळ येणाऱ्या पावसाच्या धारा घननिळया वर्षावातून पावसाचे, इंद्रधुनचे अप्रतिम दर्शन घडवतात. मृग नक्षत्रापासून उत्तरा नक्षत्रापर्यंत जोरदार बरसणारा पाऊस नक्षत्रांप्रमाणे कमी- अधिक प्रमाणात आपली उपस्थिती लावतो. हस्त नक्षत्रात पाऊस बेताचाच असतो. यावेळी परतीच्या पावसाचे संकेत जरी मिळत असले तरी, चित्रा आणि स्वाती नक्षत्रातही पाऊस पडतोच. या नक्षत्रातील पावसाचा शिडकावा लाभदायक मानला जातो. मात्र, विशाखा नक्षत्रातील पाऊस काहीसा हानिकारक मानला जातो.

पावसाचे वेळापत्रक 

प्राचीन काळी नक्षत्र वाहन पावसाचे स्वरूप कालावधी
मृग मेंढा हुलकावणी देणारा 8 ते 21 जून 
आर्दा हत्ती सरसरी पाऊस 22 जून ते 5 जुलै
पुनर्वसू बेडूक हुलकावणी देणारा 6 ते 19 जुलै 
पुष्य गाढव कुठे जास्त कुठे कमी 20 जुलै ते 2 ऑगस्ट 
आश्‍लेषा घोडा सामान्य पाऊस 3 ते 16 ऑगस्ट 
मेघा उंदीर पावसाची उघडझाप 17 ते 30 ऑगस्ट 
पूर्वा हत्ती सरासरी पाऊस 31 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर
उत्तरा मेंढा हुलकावणी देणारा 13 ते 26 सप्टेंबर 
हस्त म्हैस सरासरी पाऊस 27 सप्टेंबर ते 9 ऑक्‍टोबर 
चित्रा कोल्हा संमिश्र पाऊस  10 ते 23 ऑक्‍टोबर 
स्वाती मोर सामान्य पाऊस 24 ऑक्‍टोबर ते 7 नोव्हेंबर 

नक्षत्रांविना जीवन निरर्थक 
नक्षत्रांविना माणसाच्या, प्राणी-पशुपक्ष्यांच्या जीवनाला काहीच अर्थ नाही. त्यामुळे मानवी जीवनात पावसाच्या नऊ नक्षत्रांचे महत्त्व आहे. हे नक्षत्रांचे देणे आहे. नक्षत्रे विविध रूपात येतात. वाहनांच्या स्वरूपात त्यांची नावे पाहता, पावसाचे रूप कधी सौम्य तर कधी उग्र असा अनुभव देतात. 
प्रा. सुरेश चोपणे., 
अध्यक्ष, ग्रीन प्लॅनेट सोसायटी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com