मोठी बातमी : अकरावी प्रवेश अर्ज भरण्याचा दुसरा टप्पा या तारखेपासून  

मंगेश गोमासे
Monday, 10 August 2020

शिक्षण संचालनालयातर्फे पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती महापालिका क्षेत्रांमध्ये अकरावीसाठीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन माध्यमाने राबविण्यात येत आहे. गेल्यावर्षी अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत 21 हजार जागा रिक्त राहिल्या होत्या.

नागपूर :  अकरावी प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा उत्तम सहभाग मिळत असून, आतापर्यंत एकूण 3५ हजार 9११ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी 2३ हजार १७५ विद्यार्थ्यांनी अर्जाचा प्रथम भाग भरला आहे. यानुसार बुधवारपासून (ता. १२) अर्जाचा दुसरा भाग भरण्यास सुरूवात करण्यात येणार आहे. २२ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना अर्जाचा दुसरा भाग भरता येईल. २३ ऑगस्टला प्रवेशाची तात्पूरती यादी तर ३० ऑगस्टला अंतिम गुणवत्ता यादी प्रकाशित केली जाईल.

शिक्षण संचालनालयातर्फे पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती महापालिका क्षेत्रांमध्ये अकरावीसाठीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन माध्यमाने राबविण्यात येत आहे. गेल्यावर्षी अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत 21 हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. 190 महाविद्यालयात कला, विद्यान, वाणिज्य आणि एमसिव्हीसीच्या 58 हजार 240 जागा होत्या. यांपैकी तीन प्रवेश फेरीत 22 हजार 501 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळविला होता. 35 हजार 741 जागा रिक्त राहिल्या होत्या. 

जाणून घ्या - ‘बाळा... आईची काळजी घे, आता तुलाच सांभाळायचे आहे' वडिलांचे हे वाक्य मुलाला समजलेच नाही अन्...
 

59 हजार 40 जागांचा समावेश

यानंतर विशेष फेरी राबवीत शेवटी 21 हजार 282 जागा रिक्त राहिल्या. त्यामुळे बऱ्याच कनिष्ठ महाविद्यालयांनी ऑनलाइनऐवजी ऑफलाइन प्रवेशाची मागणी केली होती. मात्र, सरकारने त्यांची मागणी अमान्य करीत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला. प्रक्रियेत शहरातील 216 कनिष्ठ महाविद्यालयांचा सहभाग असून त्यात 59 हजार 40 जागांचा समावेश आहे. यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. 

 

2३ हजार १७५ विद्यार्थ्यांनी भरले अर्ज 

यानुसार 3५ हजार 9११ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी 2३ हजार १७५ विद्यार्थ्यांनी अर्जाचा प्रथम भाग भरला आहे. नोंदणी नियमित सुरू असून यादरम्यान २३ ऑगस्टला प्रवेशाची तात्पूरती गुणवत्ता यादी प्रकाशित केल्या जाईल. यावर २५ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदविता येणार आहे. ३० ऑगस्टला अंतिम गुणवत्ता यादी प्रकाशित केल्या जाईल. ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश नोंदविता येणार आहे.
 
अशा आहे तारखा

  • १२ ते २२ ऑगस्ट- अर्जाचा दुसरा भाग भरणे.
  • २३ ते २५ ऑगस्ट - तात्पूरती गुणवत्ता यादी व आक्षेप नोंदविणे.
  • ३० ऑगस्ट - अंतिम गुणवत्ता यादी.
  • ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर - विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश नोंदविणे. 
  • संपादन : अतुल मांगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: second phase of filling the eleventh class admission form Wednesday