सुरक्षा रक्षक तपासणार ताप

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 जून 2020

परवानगी दिल्याने दुकानांमध्ये मोठी गर्दी दिसून येत आहे. त्याचवेळी शाळांमध्ये मुलांचे प्रवेश शुल्क भरण्यासाठी पालकही जात आहेत. दुकानदारांना तसेच विविध संस्थांना येणाऱ्यांच्या शरीराचे तापमान मोजण्यासाठी थर्मल गन बंधनकारक करण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या संख्येला प्रत्येक ठिकाणी नियंत्रणात आणण्याच्या प्रयत्नात थर्मल गनने तपासणी महत्त्वाची आहे.

नागपूर : शहरातील दुकाने, कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाची थर्मल गनने तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अनेक दुकान, कार्यालयात सुरक्षा रक्षकाकडे थर्मल गन देऊन औपचारिकता पाळली जात असल्याचे चित्र आहे. सुरक्षा रक्षकाला थर्मल गनची प्राथमिक माहिती दिली गेली असली त्याच्याकडून किती गांभीर्याने तपासणी केली जाईल, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. 

परवानगी दिल्याने दुकानांमध्ये मोठी गर्दी दिसून येत आहे. त्याचवेळी शाळांमध्ये मुलांचे प्रवेश शुल्क भरण्यासाठी पालकही जात आहेत. दुकानदारांना तसेच विविध संस्थांना येणाऱ्यांच्या शरीराचे तापमान मोजण्यासाठी थर्मल गन बंधनकारक करण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या संख्येला प्रत्येक ठिकाणी नियंत्रणात आणण्याच्या प्रयत्नात थर्मल गनने तपासणी महत्त्वाची आहे.

थर्मल गनने व्यक्तिची तपासणी प्रशिक्षित व्यक्तिकडून केली जाणे अपेक्षित आहे. परंतु अनेक दुकानात नोकर किंवा सुरक्षा रक्षकाकडून तपासणी केली जात आहे. शाळांमध्येही पालकांची तपासणी सुरक्षा रक्षक करीत आहेत. ज्या व्यक्तीचे तपासणी करण्यात येत आहे, त्याच्या डोक्‍यापासून थर्मल गनचे अंतर किती असावे, याबाबत सुरक्षा रक्षक अनभिज्ञ आहेत. 

घ्या आता... दारूसाठी सुरू झाली मारामारी, डिलिव्हरी बॉयवर प्राणघातक हल्ला

एका शाळेत तपासणी करताना सुरक्षा रक्षकाकडून कधी डोक्‍याला गन लावली जात आहे तर कधी काही अंतर राखून तपासणी केली जात आहे. यातूनच सुरक्षा रक्षकांकडून योग्य तपासणी होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे दुकान, शाळा, कार्यालयांत येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करण्याची केवळ औपचारिकता पूर्ण केली जात असल्याचे अधोरेखित झाले आहे. 

नेत्यांकडे नोकरच करतात तपासणी 
आता थर्मल गन अनेकांकडे दिसून येत आहे. शहरातील काही नेत्यांनीही त्यांच्या घरी प्रवेशद्वारावर थर्मल गनसह नोकराला उभे केले आहे. अनेक नेते नागरिकांची सुरक्षा व तपासणीसाठी थर्मल गन वापरत असल्याचे सांगून स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. ही एक तांत्रिक प्रक्रिया असून नोकराने केलेली तपासणी योग्य आहे काय? असा प्रश्‍न पडला आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Security guards will check the fever