बघा किती टक्‍क्‍यांनी वाढला सीबीएसई बारावीचा निकाल....

See how many percent increase in CBSE XII result
See how many percent increase in CBSE XII result

नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) सोमवारी बारावीचा निकालाची घोषणा करण्यात आली. निकालाची एकंदरीत टक्केवारीचा विचार केल्यास गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 5.38 टक्काही वाढ झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या वर्षी 0.39 टक्के निकालात वाढ झाली होती.

15 फेब्रुवारी ते 31 मार्चदरम्यान बोर्डाद्वारे परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 19 ते 31 मार्चदरम्यान घेण्यात आलेल्या देशभरातील 29 विषयाचे पेपर रद्द करण्यात आले होते. देशातील 13 हजार 109 शाळांमधून 11 लाख 92 हजार 916 विद्यार्थी बसले होते. चेन्नई विभागात 58 हजारावर विद्यार्थ्यांचा समावेश होता. देशभरात 10 लाख 59 हजार 80 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. त्यांची टक्केवारी 88.78 आहे.

गेल्या वर्षी ही टक्केवारी 83.40 होती. यावर्षीच्या परीक्षेत मुलांच्या तुलनेत मुलींनी उत्तम कामगिरी केली. एकूण मुलींपैकी 92.15 टक्के मुली उत्तीर्ण झाल्यात. त्यातुलनेत उत्तीर्ण होणाऱ्या मुलांची टक्केवारी 86.19 टक्के म्हणजे 5.96 टक्के अधिक मुली यावर्षी उत्तीर्ण झाल्या आहेत. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत ही टक्केवारी 4 टक्‍क्‍यांनी कमी आहे.

देशातील सर्व विभागांचा विचार केल्यास त्रिवेंद्रम विभागाचा निकाल एका टक्‍क्‍याने घटला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत 98.20 टक्के वरुन निकाल 97.67 टक्‍क्‍यावर आला आहे. शहरातील सीबीएसई शाळांची कामगिरी निकालात चांगली झाल्याचे दिसून आले. जवळपास शहरात असलेल्या 18 शाळांपैकी सर्वच शाळांनी शंभर टक्के निकाल दिला. यातही मुलींनीच सर्वाधिक यश मिळविल्याचे दिसून आले. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी सीबीएसईत मिळालेल्या गुणांचे पर्सेटाईलप्रमाणे गुणानंक करून उपयोग केल्या जाणार आहे. गुणपत्रिकेत मिळालेल्या गुणांची यावर्षीपासून फेरतपासणी बंद करण्यात आली आहे. गुणपत्रिकेच्या साक्षांकित प्रत तपासणीसाठी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.

सीबीएसई बारावीच्या निकालाची आकडेवारी
एकूण शाळा - 13, 109
परीक्षा केंद्र -4,984
भारताबाहेरील विद्यार्थी - 16,043
नोंदणीकृत विद्यार्थी - 10,59,080

निकालाची टक्केवारी - 88.78

टॉप तीन विभाग
त्रिवेंद्रम - 97.67
बंगरुळु - 97.05
चेन्नई- 96.17

मुला-मुलींची टक्केवारी
मुली- 2017 - 87.50 टक्के - 2018 - 88.31 - 2019- 88.70, 2020 - 92-15
मुले - 2017 - 78.00 टक्के - 2018 - 78.09 - 2019 - 79.40 - 2020 - 86.19
ट्रान्सजेंडर - 2019 - 83.33- 2020 - 66.67

( पूर्ण विषयात )
90 टक्के पेक्षा अधिक गुण घेणारे विद्यार्थी - 243
95 टक्के पेक्षा अधिक गुण घेणारे विद्यार्थी - 42
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com