esakal | आयुक्त मुंढेच्या नावाने बघा काय सुरू आहे नागपुरात ?
sakal

बोलून बातमी शोधा

See what's going on in Nagpur in the name of Commissioner Mundhe?

आयुक्त मुंढे यांनी शिस्त, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यातून राज्यातील लोकांना भुरळ पाड़ली आहे. त्यांच्या कार्यपद्धतीने अनेक ठिकाणी सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणले आहे. नागपूरही त्याला अपवाद नाही. गेल्या काही महिन्यापासून शहरात आयुक्तविरुद्ध पदाधिकारी सामना रंगला आहे. एकमेकांवर कुरघोडीची संधी सत्ताधारी आणि आयुक्त, दोघेही सोडत नसल्याचे चित्र गेल्या काही दिवसांत दिसून आले.

आयुक्त मुंढेच्या नावाने बघा काय सुरू आहे नागपुरात ?

sakal_logo
By
राजेश प्रायकर

नागपूर : आयुक्त तुकाराम मुंढे उपराजधानीत आले तेव्हापासून नागपूरकरांच्या मनावर ते गारूड करीत आहे. सत्ताधाऱ्यांनी त्यांना जेव्हा अडचणीत पकडले, त्या-त्या वेळी त्यांच्या समर्थनात सोशल मीडियावर अनेकजण पुढे आले. त्यांच्या समर्थकांची वाढती संख्या बघता शहरातील काही अडगळीत पडलेल्या नेत्यांनीही त्यांचे समर्थन करीत स्वतःच्या राजकीय पुनर्वसनासाठी पुढाकार घेतल्याचे चित्र आहे. 


आयुक्त मुंढे यांनी शिस्त, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यातून राज्यातील लोकांना भुरळ पाड़ली आहे. त्यांच्या कार्यपद्धतीने अनेक ठिकाणी सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणले आहे. नागपूरही त्याला अपवाद नाही. गेल्या काही महिन्यापासून शहरात आयुक्तविरुद्ध पदाधिकारी सामना रंगला आहे. एकमेकांवर कुरघोडीची संधी सत्ताधारी आणि आयुक्त, दोघेही सोडत नसल्याचे चित्र गेल्या काही दिवसांत दिसून आले.

कार्यशैलीमुळे आयुक्तांच्या समर्थकांनी सत्ताधाऱ्यांवर सोशल मीडियातून तोंडसुखही घेतले. परंतु आता शहरात सत्ताधाऱ्यांच्या विरोधकांनीही आयुक्तांचे समर्थन करण्याचे प्रयत्न सुरू केले. अनेक वर्षांपासून अडगळीत पडलेल्या शहरातील काही राजकीय नेत्यांना मुंढे यांच्या नावाने 'बूस्ट'च मिळाल्याचे चित्र आहे. मुंढे यांना समर्थन करून त्यांच्या समर्थकांचेही मन जिंकण्याचा प्रयत्न सोशल मीडियातूनही सुरू झाला आहे.

'हनी ट्रॅप' प्रकरणासंबंधी गृहमंत्र्यांनी केला मोठा खुलासा, वाचा काय आहे प्रकरण...

एकूणच आयुक्‍तांचे समर्थन करण्याची स्पर्धा लागली आहे. कधी नगरसेवक तर कधी अडगळीत पडलेले नेते आयुक्तांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, यातील काहींचा आयुक्तांचे समर्थनाचा हेतू केवळ सत्ताधाऱ्यांचा विरोध करण्यासाठीच होत असल्याचेही चित्र आहे. आयुक्तांच्या आड सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करीत गेलेली राजकीय पत पुन्हा प्राप्त करण्याचे धंदे काहींनी चालविले आहे. 

शिळ्या कढीला उत 
गेल्या पंधरा वर्षांपासून भाजपची महापालिकेत सत्ता आहे. या पंधरा वर्षांच्या काळात सत्ताधाऱ्यांवर अनेक आरोप झाले. तेच जुने मुद्दे घेऊन काही जण आयुक्तांच्या दरबारी खेटे घालत आहेत. नुकताच झालेल्या पावसाने अनेक ड्रेनेज लाईन स्वच्छ न झाल्याने रस्त्यावर पाणी आले, वस्त्यांमध्ये पाणी शिरले. मात्र, लोकांच्या या समस्यांऐवजी जुने आरोपाचे मुद्देच आयुक्तांपुढे मांडले जात असल्याने अशा नेत्यांचा हेतूवर शंका व्यक्त केली जात आहे.