कोरोना ब्रेकिंग : अमरावती त्रिशतकाच्या उंबरठ्यावर; गडचिरोलीत आढळले तीन रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 June 2020

बुधवारी रात्री नव्याने तीन प्रवाशांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 47 वर पोहोचली आहे. यातील दहा जन सक्रिय आहे. तर 36 कोरोनामुक्त झालेल्यांना यापूर्वीच सुटी देण्यात आली आहे. सद्या दहा सक्रिय कोरोनाबाधितांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अमरावती : विदर्भात कोरोनाचा प्रकोप सुरूच आहे. रोज मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत चालले आहेत. नागपुरात बाधितांचा आकडा आठशेच्या पलीकडे गेला आहे. दुसरीकडे अमरावतीची तिसऱ्या शतकाकडे वाटचाल सुरू आहे. गुरुवारीत सात रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच गडचिरोलीत तिघांचे नमुने पॉझिटिव्ह आले. 

श्री संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विषाणू चाचणी प्रयोग शाळेतून प्राप्त अहवालानुसार सात व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. यासोबतच जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 287 वर पोहोचली आहे. त्रिशतकासाठी अवघ्या तीन पॉझिटिव्ह अहवालांची कमतरता आहे. गुरुवारी पॉझिटिव्ह आढळलेल्या सात जणांमध्ये दोन महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे. संबंधित व्यक्ती जुनी वस्ती बडनेरा, साबनपुरा, आकोली, सदर बाजार परतवाडा, जमील कॉलनी येथील रहिवासी आहेत. अकोली आणि साबण पुरा हे कोरोना बाधित रुग्ण आढळलेले नवे परिसर आहेत.

हेही वाचा - नागपुरात प्रीती दासचा धुमाकूळ, वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारी

गडचिरोली जिल्ह्यात तीन कोरोना पॉझिटिव्ह

बुधवारी रात्री नव्याने तीन प्रवाशांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 47 वर पोहोचली आहे. यातील दहा जन सक्रिय आहे. तर 36 कोरोनामुक्त झालेल्यांना यापूर्वीच सुटी देण्यात आली आहे. सद्या दहा सक्रिय कोरोनाबाधितांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नव्याने दिल्ली येथून स्वगावी आलेल्या रुग्णांना गडचिरोली शहरातील वनश्री कॉलनीतील संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. सदर तिन्ही रुग्ण सात जूनला गडचिरोलीत आले. यातील दोन रेल्वेने तर एक जण विमानाने प्रवास करून आला. त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. यातील तिन्ही पुरुष रुग्ण 28 ते 30 वयोगटातील आहेत. तिन्ही रुग्णांच्या विलगीकरण ठिकाणच्या संपर्कातील इतर पाच प्रवाशांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले होते. आता सात ते आठ दिवसांनी त्यांचेही दुसऱ्यांदा नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven in Amravati and three corona positive found in Gadchiroli