आंबटशौकिनांच्या मागणीत प्रचंड वाढ... बंद ब्यूटी पार्लर, ढाब्यांमध्ये रंगतोय खेळ

अनिल कांबळे
बुधवार, 27 मे 2020

मागील आठवड्यापासून नागपूर शहरात बरीच शिथिलता आली आहे. त्यामुळे आंबटशौकीन जुन्या ग्राहकांना दलालांची विचारणा सुरू आहे. तसेच काही आंबटशौकीनही स्वतःहून कॉल करून "लडकी मिलेगी क्‍या?' अशी विचारणा करीत आहेत

नागपूर : लॉकडाउनमध्ये काही दिवसांपूर्वी शिथिलता देण्यात आली. त्यामुळे अनेक दलाल सक्रिय झाले असून आंबटशौकिनांना फोन करून तरुणींना पुरविण्याबाबत विचारणा करीत आहेत, असाच एक कॉल व्हायरल झाल्यामुळे हा सौदा उघडकीस आला.

विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अडीच महिन्यांपासून देहव्यापार बंद असल्यामुळे अनेक तरुणी, महिला बेरोजगार झाल्या. पैसे कमावण्याचे दुसरे कोणतेही साधन नसल्यामुळे देहव्यापार पुन्हा सुरू होण्याची तरुणी आणि त्यांचे दलाल वाट पाहत होते. अशातच मागील आठवड्यापासून शहरात बरीच शिथिलता आली आहे. त्यामुळे आंबटशौकीन जुन्या ग्राहकांना दलालांची विचारणा सुरू आहे. तसेच काही आंबटशौकीनही स्वतःहून कॉल करून "लडकी मिलेगी क्‍या?' अशी विचारणा करीत आहेत. "सेक्‍स रॅकेट'मधील दलाल आणि तरुणींसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. तसेच झटपट कमाई करण्याचे साधनही उपलब्ध झाले आहे.

वाचा- असा घडला नागपूरच्या खालस हॉटेलमध्ये हत्येचा थरार... पोलिसांना लावला छडा

हळूहळू फोफावतोय देहव्यापार!
अनेकींनी मेकअप किट आणि नवनवीन ड्रेस विकत घेणे सुरू केले आहे. अनेक जणी ब्यूटी पार्लर किंवा हॉटेलमध्ये महिला स्टाफ किंवा ब्युटीशियन म्हणून काम करणाऱ्या तरुणींना सज्ज राहण्यासाठी दलालांचे फोन गेले आहेत. एका आंबटशौकीन ग्राहकाने महिला दलालाला फोन करीत मौजमजा करण्यासाठी मुलीची मागणी केली. हा कॉल काही ठिकाणी व्हायरल झाला. त्यावरून शहरात हळूहळू देहव्यापार वाढत असल्याची माहिती समोर आली आहे.

बंद हॉटेल, ब्यूटी पार्लर टार्गेट
अनेक तरुणी ब्यूटी पार्लरमध्ये काम करताना देहव्यापारात प्रवेश करतात. आता पैशाची चणचण असल्यामुळे ब्यूटी पार्लरच्या मालकीण किंवा दलालाशी संपर्कात आहेत. झटपट कमाईसाठी त्या आज कोणत्याही स्थराला जाण्यास तयार आहेत. पूर्वी केवळ शहरातील हॉटेलमध्ये किंवा ब्यूटी पार्लरमध्ये ग्राहकाला बोलावणारी तरुणी आता शहराबाहेरील ढाबे किंवा फार्म हाउसवर जायला तयार असल्याची माहिती आहे.

व्हॉट्‌सऍपवर अर्धनग्न फोटो
तरुणी, महिलांचे दलाल फोटोसेशन करतात. तरुणींचे अर्धवट कपड्यांवर किंवा अश्‍लील फोटो काढतात. मादक फोटो तयार केल्यानंतर आंबटशौकीन ग्राहकांच्या थेट व्हॉट्‌सऍपवर पाठवितात. प्रत्येक फोटोखाली तरुणींचा "रेट' लिहिलेला असतो. फोटो सिलेक्‍ट करून परत दलालाला पाठविल्यानंतर वेळ आणि रक्‍कम ठरविल्या जाते, अशी माहिती आहे.

दलाल आणि ग्राहकांमधील संवाद
दलाल ः हॅलो... भैया
ग्राहक ः हॅलो..जल्दी बोलो.. घर पर हूँ.
दलाल ः आज रात को छमियॉं मिल जायेगी...अगर बाहर ले जाना हो तो...
ग्राहक ः ठिक हैं...उमर कितनी हैं उसकी.. तेरा कमिशन कितना होगा?
दलाल ः भैया..आप को तो सब पता हैं... फोटो भेजे हैं...माल देखकर दे देना...!
ग्राहक ः तीन दोस्त हैं.. उसको बता देना... बाद में मचमच नही मंगता...शाम को कॉल करता हूँ.
दलाल ः जी भैया...रखता हूँ.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sex seekers again arouse