टिकटॉकच्या बंदीवर काय म्हणाली शिल्पा ठाकरे ? बघा... 

राघवेंद्र टोकेकर
बुधवार, 1 जुलै 2020

शिल्पा ठाकरे हे नाव चित्रपट आणि टीव्ही माध्यमांसाठी नवीन असेल मात्र टिकटॉकवरील तिचे व्हिडिओ पाहण्यासाठी अनेकांनी हे ऍप डाऊनलोड करून घेतले आहे. केवळ एक्‍सप्रेशनमुळे अत्यंत लोकप्रिय झालेल्या या कलाकाराने दै. सकाळसोबत चर्चा केली.

नागपूर : टिकटॉक ऍपवर फेक प्रोफाईलची संख्या प्रचंड वाढली होती. चाहतावर्ग मोठा असला तरीही अनेक कलाकारांना असुरक्षित वाटणे प्रारंभ झाले होते. व्हिडिओ बनविण्याच्या नादात आई वडिलांना कामाला लावणारी तरुण पिढी देखील सक्रीय झाली होती. अशात टिकटॉक सारख्या ऍपवर बंदी येत असेल तर हा निर्णय योग्यच झाल्याची चर्चा सध्या अभिनय क्षेत्रात आहे. 

शिल्पा ठाकरे हे नाव चित्रपट आणि टीव्ही माध्यमांसाठी नवीन असेल मात्र टिकटॉकवरील तिचे व्हिडिओ पाहण्यासाठी अनेकांनी हे ऍप डाऊनलोड करून घेतले आहे. केवळ एक्‍सप्रेशनमुळे अत्यंत लोकप्रिय झालेल्या या कलाकाराने दै. सकाळसोबत चर्चा केली. टिकटॉक, लाईक आणि युट्यूब सारख्या सोशल प्लॅटफॉर्मवर शिल्पाच्या एक्‍सप्रेशनचे व्हिडिओ तुफान व्हायरल झालेत. तिच्या चाहत्यांची संख्या लाखोंच्या घरात असून, शिल्पाच्या नव्या व्हिडिओची अत्यंत आतुरतेने चाहते वाटही पाहतात. मात्र ज्या माध्यमाचा गैरवापर होतो ते माध्यम बंद करणे चांगले असल्याचे मत तिने नोंदविले. 

धक्‍कादायक.कोरोनाच्या धास्तीने चक्‍क कुटुंबीयांनीच नाकारला मृतदेह 

अभिनयाच्या क्षेत्रात यशस्वी कारकिर्द जागविणाऱ्या मंडळींना हा निर्णय सुयोग्यच वाटतो आहे. अभिनय ही साधना आहे, ती तशीच होण्याची गरज आहे. केवळ प्रसिद्धीसाठी वाटेल ते सोंग होण्यापेक्षा टिकटॉकवर आलेली बंदी योग्यच असल्याचे मत रंगभूमी क्षेत्रातील दिग्गजांनी व्यक्‍त केले आहे. मात्र फॉलोवर्स वाढविण्याच्या नादात वाटेल त्या थराला जाऊन व्हिडिओ तयार करणाऱ्यांसाठी तर जगायचे कसे हा प्रश्‍न आहे. 

आयुक्‍त तुकाराम मुंढेंची घेराबंदी, महिला अधिकाऱ्यांनी केली ही तक्रार, काय झाला प्रकार...

टिकटॉक, लाईन आणि युट्यूबसारख्या सोशल प्लॅटफॉर्मन्सवर स्वत:च्या अभिनय कौशल्याने असंख्य जनांचा चाहता वर्ग निर्माण करणाऱ्या अभिनेत्री शिल्पा ठाकरे हिने या ऍपमध्ये झालेल्या गर्दीमुळे कलाकाराचा खरेपणा शोधणे अवघड झाले होते, जे झाले ते चांगलेच झाल्याची प्रतिक्रीया दिलेली आहे. अभिनयास करीयर म्हणून बघणे गरजेचे असते. अनेक चांगल्या, जाणकार कलाकारांना काही चुकीच्या व्यक्‍तींनी जागा मिळवली असल्याने प्रसिद्धी मिळाली नसल्याचे देखील शिल्पा म्हणाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shilpa Thackeray say about the ban on Tiktok?