शूsss शांतता...कॉपी सुरू आहे !

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 19 February 2020

जलालखेडा येथील केंद्रावर पेपर सुरू होताच काही क्षणांतच प्रश्‍नपत्रिका बाहेर आल्या. बाहेर प्रश्‍नपत्रिकांची साक्षांकित प्रत काढली जात होती. भाड्याने आणलेले काही जण ही प्रश्नपत्रिका सोडवून केंद्राच्या आत कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांना पोचविण्याचे काम करीत असल्याचा प्रकार मंगळवारी पहिल्याच दिवशी आढळला.

नरखेड (जि.नागपूर)  :  आज जिल्हयात बारावीची परीक्षा शांत वातावरणात सुरू झाली. इंग्रजीचा पेपर सुरू होण्यापूर्वी परीक्षा आसन क्रमांक शोधताना विद्यार्थ्यांची त्रेधातिरपिट उडाली होती. नरखेड तालुक्‍यात तर केंद्रावरील विद्यार्थ्यांना चक्‍क कॉपी पुरविताना काही जण आढळून आले.

क्‍लिक करा  : किती भयंकर ! पेट्रोलपंप संचालक चोवीस तास करवून घ्यायचा घरकाम, असा उघडकीस आला प्रकार

पोलिसांसमोर कॉपींचा पुरवठा सुुरू

जलालखेडा येथील केंद्रावर पेपर सुरू होताच काही क्षणांतच प्रश्‍नपत्रिका बाहेर आल्या. बाहेर प्रश्‍नपत्रिकांची साक्षांकित प्रत काढली जात होती. भाड्याने आणलेले काही जण ही प्रश्नपत्रिका सोडवून केंद्राच्या आत कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांना पोचविण्याचे काम करीत असल्याचा प्रकार मंगळवारी पहिल्याच दिवशी आढळला. यात झेरॉक्‍स दुकानवाल्यांचा कमाईचा चांगलाच धंदा सुरू होता. सर्रास प्रश्नपत्रिकेच्या झेरॉक्‍स काढण्यात येत होत्या. पेपर सुरु होताच शाळेच्या आजूबाजूला खिडक्‍यांमधून कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांना शिक्षक आणि पोलिसांसमोर कॉपी पुरविण्यात येत असूनही कुणीही त्यांना रोकण्याचे धाडस दाखवित नव्हते.

क्‍लिक करा  : नागपूरचे नगरसेवक तुकाराम मुंडेंना म्हणाले, आम्ही चोर, गुंड आहोत का?

पोलिसांनाही जुमानत नाही "कॉपीबहाद्दर'
या बाबीकडे कोणाचेही लक्ष नाही. या परीक्षा केंद्रावर स्थानिक विद्यार्थीसंख्या कमी तर बाहेरील नागपूर, काटोल अश्‍या मोठया तालुका व जिल्ह्यांतून कॉपीबहाद्दर विद्यार्थी येथील केंद्रावर पेपरला येतात. जेमतेम क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांना या केंद्रावरून उत्तीर्ण होण्याची हमी असल्याचे बोलले जाते. आता याप्रकरणी संबंधीत केंद्र संचालक, बाहेरून येणारे अतिरिक्त केंद्र संचालक व नागपूर विभागीय शैक्षणिक मंडळाचे अधिकारी काय करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

क्‍लिक करा  :  सावधान ! भूखंड घेताय, लाखोंनी होतेय फसवणूक

मौद्यात शांतता
मौदा : मौदा तालुक्‍यातील उच्च माध्यमिक 12 शाळांत परीक्षेची सुरवात आज शांतापूर्वक झाली. परीक्षेला1221 विद्यार्थी बसलेले आहेत. पर्यवेक्षक आशा गणवीर व सहायक पर्यवेक्षक रमेश घायवट यांच्या क्षेत्रात येणारे जनता कनिष्ठ महाविद्यालय मौदाचे केंद्रप्रमुख अनिल मेश्राम, श्रीमती राजकमल बाबूराव तिडके महाविद्यालयाच्या केंद्रप्रमुख श्रीमती बोरकर, साई बाबा विद्यालय निमखेडाचे केंद्रप्रमुख भुजाडे व गांधी विद्यालय वडोदाच्या केंद्रप्रमुख भिलकर यांच्या देखरेखीखाली पहिला पेपर शांततेत पार पडला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shoo sss silence ... copy continues!