एकाचवेळी ११ हजार विद्यार्थ्यांचे लॉगइन; अभियांत्रिकीचे विद्यार्थी, विद्यापीठाला मनःस्ताप

file photo
file photo

नागपूर ः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षाच्या चौथ्या दिवशी तिसऱ्या टप्प्यातील अभियांत्रिकीच्या परीक्षेदरम्यान एकाचवेळी सुमारे ११ हजार विद्यार्थ्यांनी लॉगईन केल्याने विद्यापीठालाही चांगलाच मनःस्ताप झाला.  त्यामुळे परीक्षेसाठी एक तास अधिकचा वेळ देण्यात आला. विशेष म्हणजे पेपर सबमिट होत नसल्याने विद्यार्थ्यांनी विद्यापीठ हेल्पलाईनवर फोन करीत असल्याचे दिसून आले. रात्री उशिरापर्यंत पेपर सबमिट झाले नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

विद्यापीठाच्या परीक्षा तिसऱ्या दिवशी परीक्षा सुरळीत पार पडल्याने विद्यापीठाला थोडाफार दिलासा मिळाला होता. या आत्मविश्वासाने सोमवारी (ता.१२) विद्यापीठाच्या परीक्षा घेण्यात आल्या. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा सुरळीत आटोपल्यानंतर चौथ्या टप्प्यात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याच्या समावेश करण्यात आला होता.

या परीक्षेमध्ये ११ हजार २८९ विद्यार्थ्यांचा समावेश होता. मात्र, सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना ॲपमध्ये लॉगइन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. त्यामुळे साडेतीन वाजताच्या पेपरता ११ हजार ९१ विद्यार्थी ४.१५ वाजता रजिस्टर्ड झालेत. यामुळे जे विद्यार्थी रजिस्टर्ड झालेत त्यांना एक तास वेळ वाढवून देण्यात आला. दरम्यान बऱ्याच विद्यार्थ्यांना पेपर सोडविल्यानंतर तो पेपर सबमिट करण्यासाठी बराच उशिर लागला. या प्रकाराने विद्यार्थ्यांना बराच मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे पालक आणि विद्यार्थी हैराण झाले होते. रात्री

३३३ विद्यार्थी अनुपस्थित
विद्यापीठाच्या अंतिम सत्रातील चौथ्या टप्प्यातील परीक्षांमध्ये तांत्रिक गोंधळ झाल्याचे दिसून आले. या प्रकाराने विद्यार्थ्यांना मनस्ताप झाला. मात्र एकंदरीत चारही टप्प्यात ३३३ विद्यार्थी अनुपस्थित राहील्याचे दिसून आले. यामध्ये पहिल्या टप्प्यात ३३, दुसऱ्या टप्प्यात ६, तिसऱ्या टप्प्यात ४२ तर चौथ्या टप्प्यात सर्वाधिक २५२ विद्यार्थ्यांचा समावेश होता.

प्रॉक्टरींगमुळे येतेय समस्या
ॅॲपचा वापर करताना ओटापी येण्यास जराही उशिर झाल्यास विद्यार्थी पुन्हा पुन्हा ओटीपी जनरेच करतो. यातूनही समस्या उद्भवतात. याशिवाय पेपर सबमिट करताना अशाचप्रकारे घाई करीत असल्याचे दिसून आले आहे. याशिवाय विद्यापीठाच्या ॲपमध्ये विद्यार्थ्यांनी कुठलाही गैरप्रकार करू नये यासाठी प्रॉक्टरींगचा उपयोग करण्यात आला आहे. यामध्ये इमेज, व्हाईस रेकॉर्ड होत असल्याने ही समस्या उद्भवत असल्याची माहिती समोर येत आहे.

सत्र- परीक्षार्थी - उपस्थिती

  • प्रथम - २,५०५ - २,४५९
  • द्वितीय - १८६ - १८०
  • तृतीय - १,७४४ - १,७०२
  • चौथे- ११,२८९- ११,०९१

डाटा व्यवस्थित सबमिट झाला
एकाच वेळी इतक्या प्रमाणात विद्यार्थी परीक्षेचे ॲप सुरू करीत असल्याने परीक्षेच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी वेळ लागला. मात्र, विद्यापीठाने त्यांना वेळ वाढवून दिला. यानंतर पेपर सबमिट होत नसल्याच्या तक्रारी समोर आल्यात. मात्र, त्यांचा डाटा व्यवस्थित सबमिट झाला आहे.
डॉ. प्रफुल्ल साबळे,
संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com