गायक विजय चिवंडेंचे कोरोनाने निधन

राजेश प्रायकर
Friday, 14 August 2020

विजय चिवंडे यांची पहिली कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांनी दुसरी कोरोना चाचणी केली. यात ते पॉजिटिव्ह आढळून आले. तीन दिवसांपूर्वी ते मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते.

नागपूर :  गेल्या दीड दशकापासून शहरातील विविध कार्यक्रमातून आपल्या आवाजाने नागपूरकरांची मने जिंकणारा तरुण गायक विजय चिवंडे यांचा आज सकाळी कोरोनाने मृत्यू झाला. तीन दिवसांपासून ते मेयोमध्ये उपचार घेत होते. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील व्यक्तिंनी व त्यांच्या चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली.

विजय चिवंडे यांची पहिली कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांनी दुसरी कोरोना चाचणी केली. यात ते पॉजिटिव्ह आढळून आले. तीन दिवसांपूर्वी ते मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. आज सकाळी त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने आयसीयूमध्ये भरती करण्यात आले. तेथेच त्यांचे निधन झाल्याचे त्यांच्या कुटुंबातील सदस्याने सांगितले. केवळ ४२ वर्षे वय असलेल्या विजय चिवंडे यांच्या अचानक निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे वृद्ध आई, पत्नी, १० वर्षांचा मुलगा आहे.

सविस्तर वाचा - मृत्यूसत्र थांबेना : अबतक ४२०, कोरोनामुक्त होण्याचा दरही घसरला

विजय चिवंडे यांनी शहरच नव्हे तर विदर्भातही आपल्या आवाजाची छाप पाडली होती. गेल्या आठ दिवसांत शहरातील सांस्कृतिक क्षेत्राला हा दुसरा धक्का आहे. १ ऑॅगस्टलला शेखर घटाटे या ५९ वर्षीय गायक कलावंताचा कोरोनाने मृत्यू झाला होता. त्यांनाही मेयाे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना न्युमोनिया झाला व काल १ ऑगस्ट रोजी रात्री २.१५ मिनिटांनी त्यांचे निधन झाले.

संपादन - स्वाती हुद्दार
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Singer Vijay Chivande is no more