भाऊ समजून बांधत होती राखी नंतर केले बंद, मग सुरू झाला त्रास...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 9 February 2020

पारडसिंगा (जि. नागपूर) : पारशिवनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महादुला येथे माणुसकीला लाजवणारी घटना नुकतीच उघडकीस आली. येथील एका युवकाने मानलेल्या बहिणीचाच विनयभंग केला. पोलिसांनी विनयभंगाची कार्यवाही करून न्यायालयासमोर उभे केले असता आरोपीस जमानतीवर सोडले. मात्र, पीडितेच्या जीवितास धोका असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले असून, न्यायाची मागणी केली आहे. प्रणीत सुनील सहारे (वय 25, रा. महादुला) असे आरोपीचे नाव आहे. 

पारडसिंगा (जि. नागपूर) : पारशिवनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महादुला येथे माणुसकीला लाजवणारी घटना नुकतीच उघडकीस आली. येथील एका युवकाने मानलेल्या बहिणीचाच विनयभंग केला. पोलिसांनी विनयभंगाची कार्यवाही करून न्यायालयासमोर उभे केले असता आरोपीस जमानतीवर सोडले. मात्र, पीडितेच्या जीवितास धोका असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले असून, न्यायाची मागणी केली आहे. प्रणीत सुनील सहारे (वय 25, रा. महादुला) असे आरोपीचे नाव आहे. 

पीडिता ही महादुला येथील असून, पारशिवनी येथील महाविद्यालयाची बी. ए. प्रथम वर्षाची विद्यार्थिनी आहे. पीडिता ही आरोपीस 2015 पूर्वीपर्यंत राखी बांधत होती. नंतर तिने प्रणीतला राखी बांधणे बंद केले. आरोपी प्रणीत सहारे हा पीडितेला दोन वर्षांपासून त्रास देत होता. तो तिला मोबाईलवर अश्‍लील व्हिडिओ व फोटो पाठवीत होता. त्याने तिची छेडखानी करण्याचादेखील यापूर्वी प्रयत्न केला होता. 

जाणून घ्या -  प्रियकराला मारहाण करून मुलीला घेऊन भुर्रर्र...वाचा ही प्रेमकहाणी

पीडितेचे गावातीलच मुलाशी लग्न जुळलेले असतानाही त्याने त्रास देणे सुरूच ठेवले. तो तिला मोबाईलवर अश्‍लील मेसेज पाठवून अनैतिक कृत्य करण्यास प्रवृत्त करीत होता. तरीही ती दाद देत नव्हती. 22 डिसेंबरला रात्री आठ वाजताच्या सुमारास पीडिता बोरिंगवर पाणी भरायला गेली असता प्रणीतने अडविले व हात पकडून तिला घरात ओढण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याने पीडितेच्या शरीराला ठिकठिकाणी स्पर्श केला. यावेळी पीडिता कमालीची घाबरलेली होती. कशीबशी सुटका करून ती घरी परत आली. त्यानंतर प्रणीतने सतत "कॉल' केले; पण पीडितेने उचलले नाही. 

27 जानेवारीला सकाळी पीडितेचे भावी पती हे पीडितेच्या घरासमोरील बोरिंगजवळ उभे असताना आरोपीच्या वडिलांनी त्यांना मारहाण केली व पीडितेला शिवीगाळ केली. त्यामुळे पीडितेने 27 जानेवारीला दुपारी पारशिवनी पोलिस ठाणे गाठून झालेल्या प्रकाराची तक्रार नोंदविली. पोलिसांनी 354 ची कार्यवाही करून आरोपीस पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने आरोपीस जामिनावर सोडले. यावेळी पोलिसांनी पीडितेचा मोबाईल तपासणीसाठी ठेवून घेतला. 

हेही वाचा -  लाखनीत झाला शिक्षिकेच्या अपहरणाचा प्रयत्न; आरोपी व्हॅनटालकास अटक

या घटनेमुळे पीडिता प्रचंड दबावाखाली आहे. आरोपी पुन्हा कधीही विनयभंग करू शकतो. भविष्यात आपल्याला व कुटुंबाला धोका आहे. त्यामुळे योग्य ती कायदेशीर कार्यवाही करून आपल्याला न्याय देण्यात यावा, अशी मागणी पीडितेने पत्रकार परिषदेत केली आहे. यावेळी घनश्‍याम टिकमकर, चंपालाल सरीले, धीरज सोमकुंवर, सौरभ वासनिक, राजू सावरकर, क्रिष्णा बघले आदी परिसरातील नागरिक उपस्थित होते. 

मोबाईल तपासणीसाठी प्रयोगशाळेत 
पीडित मुलीची तक्रार तत्काळ दाखल करून घेतली असता आरोपीला 29 जानेवारीला दुपारी अटक केली. पीडित मुलीने तक्रार केली त्यानुसार, पोलिसांनी योग्य ती कारवाई केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने जामीन दिला. प्रत्येक शनिवारी आरोपी मुलाला पारशिवनी पोलिसांत हजेरी द्यावी, अशी सूचना देण्यात आली आहे. आरोपीविरोधात पारशिवनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच संबंधित आरोपी व फिर्यादी यांचे मोबाईल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहे. घटना ही 26 जानेवारी 2020 ची असून, 27 जानेवारीला तक्रार देण्यात आली. 29 जानेवारीला आरोपीला अटक करण्यात आली होती. 
- रोशन काळे, 
तपासी अंमलदार, शिपाई


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sister tortured in Nagpur district