esakal | उपराजधानीत ऑनर किलिंग : बहिणीच्या प्रियकराचा भावाने केला खून; तीन दिवसांतील तिसरे हत्याकांड
sakal

बोलून बातमी शोधा

Sisters boyfriend murdered by brother in Nagpur

काही दिवसांतच किशोर तिच्याशी जवळीक साधत होता. तिचा मोबाईल क्रमांक मिळवून फोन करणे आणि चॅटिंग करीत होता. किशोरची रियासोबत चांगली मैत्री झाली. परंतु, ही मैत्री रिजवानला खटकत होती.

उपराजधानीत ऑनर किलिंग : बहिणीच्या प्रियकराचा भावाने केला खून; तीन दिवसांतील तिसरे हत्याकांड

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : प्रेमास विरोध केल्यानंतर आजी-नातवाचा खून करण्याच्या घटनेची शाई वळण्यापूर्वीच शनिवारी उपराजधानीत पुन्हा एक थरार घडला. भावाने बहिणीच्या प्रेमास विरोध दर्शवित प्रियकराचा धारदार शस्त्रांनी भोसकून खून केला. गेल्या ४८ तासांतील प्रेमप्रकरणातून घडलेले हे तिसरे हत्याकांड होय. किशोर नंदनवार (२५, रा. शिवनगर) असे खून झालेल्या आरोपीचे नाव आहे. तर रिजवान खान (२५, रा. शिवनगर) असे आरोपीचे नाव असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर नंदनवार आणि आरोपी रिजवान खान हे दोघे मित्र आहे. दोघांचे कौटुंबिक संबंध आहे. किशोरची रिजवानने  मानलेली बहीण रिया (बदललेले नाव) हिच्याशी ओळख करून दिली.

हेही वाचा - हृदयद्रावक! १० वर्षांच्या मुलाची हत्या करून आईने संपवले जीवन; संसाराला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल

काही दिवसांतच किशोर तिच्याशी जवळीक साधत होता. तिचा मोबाईल क्रमांक मिळवून फोन करणे आणि चॅटिंग करीत होता. किशोरची रियासोबत चांगली मैत्री झाली. परंतु, ही मैत्री रिजवानला खटकत होती.

त्याने यापूर्वी तीनेवेळा रियाशी न बोलण्याची तंबी दिली. मात्र, किशोरने रियासोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. त्यामुळे रिजवान चिडला. रियाशी असलेल्या प्रेमसंबंधामुळे दोघांत वितृष्ठ आली. दोघांचा वाद झाला.

अधिक माहितीसाठी - राणे दाम्पत्य आत्महत्या प्रकरणाचे गूढ उकलले : कुत्र्याचे इंजेक्शन देऊन पत्नीने केला पती, मुलांचा खून

यानंतर रियासोबत प्रेम संबंध तोडण्याची रिजवानने धमकी दिली होती. दोन आठवड्यानंतर रिया आणि किशोर पुन्हा सोबत दिसले. त्यामुळे चिडलेल्या रिजवानने किशोरला फोन केला आणि भेटायला बोलावले, अशी माहिती यशोधरानगर पोलिसांनी दिली.

असा काढला काटा

मांजरी गावाजवळील रेल्वे पुलाजवळ दोघांनी भेटण्याचे ठरविले. रिजवानला काटा काढायचा असल्यामुळे तो पूर्वतयारीच आला होता. शनिवारी सकाळी दोघेही पुलाखाली भेटले. रियाशी असलेल्या प्रेमसंबंधावरून दोघांत वाद झाला. ‘रिया मेरा प्यार हैं’ असे म्हणत संबंध तोडण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या रिजवानने पाठीमागे लपविलेला धारदार चाकू काढून किशोरच्या पोटात भोसकला. किशोरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

अधिक वाचा - भीषण अपघात! मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या चौघांना टेम्पोनं चिरडलं, तिघांचा जागेवरच मृत्यू

मनीषाचा जीवन-मृत्यूशी संघर्ष

नंदनवनमधील केडीके कॉलेज रोडवर चार दिवसांपूर्वी प्रशांत देवेंद्र भारसागळे (वय २४ रा. देवरी, जि.गोंदिया) याने प्रेमसंबंध कायम ठेवण्यास नकार देणाऱ्या प्रेयसीवर (मनीषा) चाकू हल्ला केला होता. ती सध्या जीवन-मृत्यूशी संघर्ष करीत आहे. दोन दिवसांपूर्वीच प्रेयसीची आजी प्रमिला उर्फ लक्ष्मी धुर्वे आणि भाऊ यश यांचा मोईन खान याने चाकूने भोसकून खून केला, हे विशेष.

संपादक - नीलेश डाखोरे