esakal | बाप रे बाप, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी साप!
sakal

बोलून बातमी शोधा

snek.

आज सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री निवासस्थानातील पोलिसांच्या वायरलेस कक्षामध्ये तेथे कार्यरत पोलिसांना सहा ते सात फूटांचा साप दिसला अन् एकच तारांबळ उडाली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीचा अपवाद वगळता एरवी मुख्यमंत्र्यांच्या रामगिरीवर शांतता असते.

बाप रे बाप, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी साप!

sakal_logo
By
राजेश प्रायकर

 नागपूर : नागपूरचा सिव्हिल लाईन परिसर म्हणजे व्हीव्हीआयपींची निवासस्थाने. उपमुख्यमंत्र्यांचे निवासस्थान देवगिरी, रविभवनमधील मंत्र्यांच्या कॉटेजेस आणि खुद्द मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान रामगिरी. आज हा परिसर निराळ्या कारणाने चर्चेत आला.

येथील मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या रामगिरीतील एका खोलीत सहा ते सात फूटाचा मोठा साप आढळून आला. त्यामुळे तिथे तैनात असलेल्या पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. पोलिसांनी तत्काळ सर्पमित्राला पाचारण केले. अर्ध्या तासाच्या थरारानंतर सर्पमित्राने सापाला पकडून वन विभागाच्या स्वाधीन केले.

आज सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री निवासस्थानातील पोलिसांच्या वायरलेस कक्षामध्ये तेथे कार्यरत पोलिसांना सहा ते सात फूटांचा साप दिसला अन् एकच तारांबळ उडाली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीचा अपवाद वगळता एरवी मुख्यमंत्र्यांच्या रामगिरीवर शांतता असते.

परंतु आज सापामुळे झालेल्या धावपळीमुळे अनेकांची पाऊले उत्सुकतेपोटी रामगिरीकडे वळली. येथील पोलिसांनी तत्काळ सदर पोलिस स्टेशनला माहिती देत सर्पमित्राला बोलावण्याची विनंती केली. सदर पोलिसांनी हायकोर्ट परिसरातच वास्तव्यास असलेले सर्पमित्र शुभम पराळे यांच्याशी संपर्क केला. शुभम पराळे दहा मिनिटांमध्ये रामगिरी येथे पोहोचले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी वायरलेस कक्षात प्रवेश केला. या कक्षात साप पोलिसांनी ठेवलेल्या बंदूक आदी शस्त्रावर गुंडाळी मारून बसला होता. सापाच्या भीतीने पोलिस कक्षाबाहेर होते. सर्पमित्र पराळे यांनी दहा मिनिटे सापाशी संघर्ष करीत त्याच्यावर नियंत्रण मिळवले. त्यांनी सापाला एका पोत्यात भरून बंदिस्त केले. सापाला पकडल्यानंतर सेमीनरी हिल्स येथील ट्रांझिट सेंटरवर पंचनामा करून वनविभागाच्या स्वाधिन करण्यात आले. सापाला कान्होलीबारा किंवा हिंगणा परिसरातील जंगलात सोडण्यात येईल, असे सर्पमित्र शुभम पराळे यांनी सांगितले.

सविस्तर वाचा - खासदार नवनीत राणा यांना नागपूरला हलविले

दोन वर्षांपूर्वी तीन साप
जुलै २०१८ मध्ये पावसाळी अधिवेशन नागपुरात झाले. या अधिवेशनाला दोन दिवस शिल्लक असताना रामगिरीवर तीन साप निघाले होते. एवढेच नव्हे त्यावेळी तत्कालीन मंत्री पंकजा मुंढे यांच्या कॉटेजमध्येही दोनदा साप निघाले होते. पावसाळ्यात रामगिरी परिसर विविध झाडे व वनस्पतीमुळे गर्द हिरवाईने नटलेला असतो. या काळात साप तसेच इतर किटकांचाच या परिसरात जास्त वावर असल्याने नागरिकांनागपूरच्या त कायम भीती असते.

संपादन - स्वाती हुद्दार