रियल हिरो सोनू सूद म्हणाला, 'थॅंक यू सो मच'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जून 2020

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदी जाहिर झाली अन्‌ जगायचे कसे ? पोराबाळांचे पोट भरायचे कसे? आईबापांचे दर्शन घडेल का अशा असंख्य प्रश्‍नांनी स्वत:चे घर, राज्य सोडून महाराष्ट्रात स्थायिक झालेले लोक बेजार झाले. काम धंदे बंद झाले अन्‌ स्थलांतरित लोकांनी मिळेल त्या मार्गाने गावाकडची वाट धरली. दूर्दैव असे की, ज्यांना वाहने मिळाली नाही अशा अनेकांनी मैलोनमैल पायीवारी करत घराचा उंबरठा गाठला. या महास्थलांतरणाचे स्वत:च्या घरी सुरक्षित असलेले लोक जसे साक्षीदार झाले तसेच मुंबईत राहणारे नागपूरकर संगीतकार विशाल शेळके हे देखील झाले.

नागपूर : लॉकडाउनमध्ये अनेक उलथापालथी झाल्या. माणसांच्या, नात्यांच्या अन्‌ गावांच्या संबंधांवर त्याचा मोठा परिणाम बघायला मिळाला. दोन वेळचे अन्न मिळेनासे झाल्याने असंख्य मजुरांनी पायपीट करीत गावाकडची वाट धरली. या वाटसरूंच्या वेदनांवर फुकर घालण्याचा छोटासा प्रयत्न नागपूरकर संगीतकाराने केला असून, त्याचा व्हिडिओ झपाट्याने व्हायरल झाला. विशेष म्हणजे, या कवितेसाठी अभिनेता सोनू सूदने नागपूरकरांचे आभार मानले. 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदी जाहीर झाली अन्‌ जगायचे कसे ? पोराबाळांचे पोट भरायचे कसे? आईबापांचे दर्शन घडेल का अशा असंख्य प्रश्‍नांनी स्वत:चे घर, राज्य सोडून महाराष्ट्रात स्थायिक झालेले लोक बेजार झाले. काम धंदे बंद झाले अन्‌ स्थलांतरित लोकांनी मिळेल त्या मार्गाने गावाकडची वाट धरली. दूर्दैव असे की, ज्यांना वाहने मिळाली नाही अशा अनेकांनी मैलोनमैल पायी घर गाठले. या महास्थलांतरणाचे स्वत:च्या घरी सुरक्षित असलेले लोक जसे साक्षीदार झाले तसेच मुंबईत राहणारा नागपूरकर संगीतकार विशाल शेळके देखील झाले. मात्र येथेच न थांबता मजुरांच्या वेदनांवर भाष्य करणाऱ्या गौतम खवर यांनी रचलेल्या कवितेला विशाल शेळके यांनी संगीतबद्ध करून स्वत:चा आवाजही दिला. 

वाचा पार्टीत पोहोचला कोरोना रुग्ण अन् नागपूरच्या या परिसरातील ७०० जणांचा झाला घात

सोशल मिडियावर झापाट्याने व्हायरल झालेल्या या कवितेला असंख्य चाहते लाभले. अवघ्या चार तासांत 73 हजार लोकांनी कवितेला लाईक केले. इतकेच नव्हे तर ही कविता सोनू सूद यांच्यासह एक हजार दोनशेहून अधिक नेटकऱ्यांनी रिट्विट केली आहे शिवाय कवितेच्या कमेंटबॉक्‍समध्ये चाहत्यांनी कौतुकाचा अन्‌ अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. मजुरांच्या नशिबी आलेल्या टाळेबंदीतील वेदना टिपण्याचा विशालने केलेला हा प्रयत्न त्यांनी सोनू सूद यांच्या सेवाकार्याला समर्पित केला. त्यासाठी सोनू सूदने विशालचे धन्यवाद देखील मानले. विशालेचे शालेय शिक्षण महाल येथील डिडिनगर स्कूल येथून झाले आहे. संगीताचे शास्त्रोक्‍त शिक्षण ए आर रहमान म्युझिक अकॅडमीतून घेतले असून, गत काही वर्षांपासून तो मुंबईत स्थायिक झाला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sonu Sood thanked Nagpurkar musician