या पथकात राहिल महसूल कर्मचारी, शस्त्रधारी पोलिसांचा समावेश, वाचा कशाचे आहे "हे' पथक....

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 जुलै 2020

संबंधित ग्रामपंचायतीला महसूल कराच्या 70 ते 80 टक्के फंड दिला जातो. नदी-नाले व खनिज संपत्ती जरी शासनाची असली तरी ती सांभाळण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे. त्यामुळे ग्राम दक्षता समितीलाही जबाबदारी देण्यात आली आहे. यात सरपंच, सचिव, पोलिस पाटील व
ग्रामसदस्यांचा समावेश आहे. याविषयी नियुक्त पथकाने अवैध उत्कलनाच्या तक्रारीबाबत ग्रामस्तरावर कर्तव्यात कसूर केला. तक्रार दिली नाही. अशावेळी तालुकास्तरावरील पथकाने कारवाई केल्यास संबंधित सरपंचाला अपात्र केले जाईल,

सावनेर (जि.नागपूर) : कळमेश्वर तालुक्‍यातील 24 प्रकरणांत 21 लाख 77 हजारांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी अतुल मेहत्रे यांनी शुक्रवारी कार्यालयात आयोजित स्थानिक पत्रकार परिषदेत दिली. अवैध गौण खनिज उत्खनन व अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात कारवाया होऊनही प्रकार घडतच आहेत. त्यामुळे शासनाने कडक कारवाईचा बडगा उभारला आहे. नियंत्रणासाठी तालुकास्तरावर व ग्रामस्तरावर पथक नियुक्त केले आहे. तालुक्‍यात अशा 14 पथकांची नियुक्ती करण्यात आली. यात तलाठी, मंडळ अधिकारी, महसूल कर्मचारी व शस्त्रधारी पोलिसांचा समावेश आहे.

अधिक वाचा : सीमा तपासणी नाक्‍यावर दिवसाला 10 लाख कमाई, अधिकारी मालामाल, काय आहे प्रकरण

एक कोटी 77 लाखाचा दंड वसूल
अवैध गौण खनिज उत्खनन व अवैध वाहतुकीच्या संदर्भात तालुक्‍यात महसूल विभागाने मागील वर्षी केलेल्या वाळू, मुरूम, दगड, माती आदी खनिज संपत्तीच्या कारवाईत 71 लाख 77 हजार रुपयांचा दंड वसूल केला होता. यंदा मात्र अवैधरीत्या केलेल्या उत्कलन व अवैध वाहतुकीसंदर्भात 148 प्रकरणांत कारवाई करीत एक कोटी 66 हजारांचा दंड वसूल केला.

अधिक वाचा : बनवेगिरी...एकाच नावाने तीन शाळांमध्ये प्रवेश

...तर होईल सरपंच अपात्र
संबंधित ग्रामपंचायतीला महसूल कराच्या 70 ते 80 टक्के फंड दिला जातो. नदी-नाले व खनिज संपत्ती जरी शासनाची असली तरी ती सांभाळण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे. त्यामुळे ग्राम दक्षता समितीलाही जबाबदारी देण्यात आली आहे. यात सरपंच, सचिव, पोलिस पाटील व
ग्रामसदस्यांचा समावेश आहे. याविषयी नियुक्त पथकाने अवैध उत्कलनाच्या तक्रारीबाबत ग्रामस्तरावर कर्तव्यात कसूर केला. तक्रार दिली नाही. अशावेळी तालुकास्तरावरील पथकाने कारवाई केल्यास संबंधित सरपंचाला अपात्र केले जाईल, असेही मेहत्रे म्हणाले.

मोठी बातमीः   निरोगी व्यक्‍तीवर होणार कोरोना प्रतिबंधक लशीची चाचणी, नागपुरातील या रूग्णालयात सुविधा...

वाहतुक करणा-यांनो ही काळजी घ्या !
प्रशासनाने कठोर धोरण अवलंबिले असून अवैध गौण खनिज उत्खनन व अवैध वाहतुकीसंदर्भात महसूल विभाग पोलिस विभाग व परिवहन विभाग यांची संयुक्त कारवाई केली जात असल्याने अशा लोकांना तिहेरी कारवाईला समोरे जावे लागत आहे. एकाच व्यक्तीवर तीनदा कारवाया झाल्यानंतर अशांना तडीपार करण्याची तरतूद असल्याचेही सांगण्यात आले. या व्यवसायातील लोकांनी कारवाई टाळण्यासाठी कायदेशीररीत्या गौण खनिजाचे उत्खनन करावे. तसेच वाहतूकदारांनी महसूल भरल्याची ऑनलाइन नोंद असलेली रॉयल्टी सोबत बाळगावी, असेही आवाहन उपविभागीय अधिकारी अतुल मेहत्रे यांनी व्यवसायिकांना केले. याप्रसंगी प्रभारी तहसीलदार सतीष मासाळ, नायब तहसीलदार, चैताली दराडे आदींची उपस्थिती होती.

शेतीकामासाठी असलेली वाहने होणार "सस्पेंड'
शेतीच्या वापरासाठी शासकीय योजनेतून घेतलेले ट्रॅक्‍टर अवैध गौण खनिज वाहतुकीसाठी वापरतांना आढळून आल्यास अशा वाहनांवर महसूलचा दंड, फौजदारी कारवाई व परिवहन विभागातर्फे वाहन "सस्पेंड' केले जाणार आहे.

जप्त केलेल्या वाळूचा लिलाव
सावनेर, खापा, खापरखेडा व केळवद आदी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जप्त करण्यात आलेल्या वाळूचा 13 जुलैला सकाळी अकराला उपविभागीय कार्यालयात लिलाव केला जाणार आहे. राम डोंगरी घाटावरील अवैध रित्या वाळूचा उपसा केलेला 220 ब्रास वाळूसाठा आढळून आल्याने मंडळ अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून खापा पोलिसांनी शेत मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The squad will consist of revenue staff, armed police