गुड न्यूज : नागपूर जिल्हयाच्या "या' तालुक्‍यात होणार राज्य राखीव महिला पोलिस बटालियन केंद्र...

file
file

काटोल (जि.नागपूर) : जिल्हयातील नजिकच्या तालुक्‍यात आवश्‍यक असणाऱ्या सर्व सुविधा व सोयी उपलब्ध असल्याने, राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) महिला बटालियनची स्थापना करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, गृहविभाग अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, वित्त विभाग मुख्य सचिव मनोज सैनिक, गृहविभाग विशेष सचिव गुप्ता, पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल, एसआरपीएफ महासंचालक विभाग अर्चना त्यागी व विविध विभागांचे सचिव आदी उपस्थित होते.

अधिक वाचा : बापरे !चोरांच्या टोळीत चक्‍क पोलिस हवालदार, असा झाला भंडाफोड...

उणिव भरून काढण्यासाठी पोलिस प्रशिक्षण केंद्र
काटोल शहर दळणवळणाच्या दृष्टीने मध्यभागी असून, रेल्वे, विमान आदी वाहतुकीला अत्यंत सोयीचे आहे. एसआरपीएफ पोलिस प्रशिक्षणास लागणारी जागा उपलब्ध असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. सध्या सणासुदीचे दिवस येत असून, राज्यात सैनिकांची कमतरता भासत आहे. शासन नवीन भरतीचा निर्णय घेत असून महिला कर्मचारी गरज भरून काढण्यास एसआरपीएफ पोलिस प्रशिक्षण केंद्र काटोल येथे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सरकारच्या निर्णयाचे स्वागत
शहरात केंद्र सुरू होणार असल्याने राज्यात काटोलचे महत्त्व वाढणार आहे. ही संधी शहराला मिळत असल्याबद्दल जि. प. सदस्य सलील देशमुख, चंद्रशेखर कोल्हे, समीर उमप, बाजार समितीचे सभापती तारकेश्वर शेळके, जि. प. माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले, माजी पं. स. उपसभापती अनुप खराडे, राष्ट्रवादीचे गणेश चन्ने, उज्ज्वल भोयर, गणेश सावरकर, स्वप्नील व्यास, संजय राऊत, नितीन ठवळे, प्रशांत खंते आदींनी स्वागत केले आहे.

काटोल तालुक्‍यासाठी अभिमानाची बाब
राज्यात प्रभावीपणे गृहमंत्रिपद सांभाळणारे काटोलचे आमदार तथा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे धडाडीचे कार्य, तत्परता व निर्णयक्षमतेमुळे राज्यातील परिस्थिती यशस्वी संभाळत आहे. त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन जिल्ह्यात काटोल तालुक्‍यात महत्त्वाचे महिला पोलिस बटालियन स्थापन होणे अभिमानाची बाब आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र मतदारसंघात स्वागत होत आहे. अनेकांना यामुळे रोजगार मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com