वाघांच्या हद्दीसाठीच्या संघर्षाने वाढविली चिंता, कुणी व्यक्‍त केली खंत...

The Struggle For The Tiger's Territorial Fight
The Struggle For The Tiger's Territorial Fight
Updated on


नागपूर,  ः वन विभागाने बहेलिया शिकाऱ्यांना जेरबंद केल्यानंतर संघटीत शिकाऱ्यांची साखळी खंडीत झाली आहे. त्यामुळे राज्यातील वाघांच्या शिकारीत घट झालेली असताना अधिवासाच्या संघर्षामध्ये राज्यात पाच तर मध्यप्रदेशात 12 वाघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे भविष्यात विकास साधताना वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासाचा गंभीर विचार करावा लागणार आहे. अन्यथा, मानव-वन्यजीवांचा संघर्ष हा जगण्यासाठी होणार असल्याची चिंता वन्यजीव प्रेमींनी व्याघ्र दिनाच्या पुर्व संध्येला "सकाळ'शी बोलतांना व्यक्त केली. 

2013 पूर्वी वाघांच्या शिकारीचे प्रमाण सतत वाढत होते. वन विभागाने अतिशय शिताफीने 32 बहेलिया शिकाऱ्यांना पकडले आणि त्यांची साखळी शोधली. दिल्लीच नव्हे तर विदेशातील तस्कराचाही शोध लावला. यामुळे घाबरलेल्या शिकाऱ्यांची साखळी खंडीत झाल्याने देशातील वाघांच्या शिकारीचे प्रमाण कमी झालेले आहे. असे असले तरी संघटीत शिकाऱ्याबद्दल कायम सतर्क राहणे गरजेचे आहे, असे वनाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मानव-वन्यजीव संघर्ष वाढू लागला असताना राज्यात गेल्या सात महिन्यात 13 वाघांचा मृत्यू झाला आहे. त्यात सर्वाधिक सात वाघ चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत.

मध्य प्रदेशात 17 वाघ मरण पावले आहे. वाघांच्या मृत्यूच्या संख्येत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे. वाघ वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत असताना वाघांच्या मृत्यूची वाढणारी संख्या चिंताजनक आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक 7, गडचिरोली तीन, नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्रप्रकल्पाच्या परिसरात एक, गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रातील दोन वाघांचा समावेश आहे. गोरेवाड्यात आणलेले दोन्ही वाघ हे चंद्रपूर जिल्ह्यातीलच आहेत. वन्यजीव संरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. यातील सहा वाघांची शिकार झाल्याचे उघडकीस आले आहे. 13 मधील एक वाघ हा बोरीवली प्राणीसंग्रहालयातील आहे. 

"व्याघ्रभूमी' म्हणून नागपूरची ओळख आहे. मध्यभारतात सर्वाधिक 70 टक्के वाघ आहे. राज्यात वाघांची संख्या वाढत असताना त्यांचे मृत्यूही वाढते आहे. यामुळेच राज्य सरकारने 50 वाघांना इतरत्र हलविण्याचा विचार सुरू केलेला आहे. वाघाचे अस्तित्व असलेल्या परिसरात वन कर्मचाऱ्यांची गस्त वाढविण्यात आलेली आहे. देशभरात आतापर्यंत 66 वाघ दगावले आहेत. 

नवीन अधिवास तयार करावेत 

जागा कमी पडत असल्याने वाघ आणि मानव यांच्यात संघर्ष होत आहे. वाघांचे "कॉरिडॉर ब्रेक' होणार नाही याची काळजी सरकारने घेणे गरजेचे आहे. हॅबिटॅट विकास केल्यास तृणभक्षक प्राणी वाढेल आणि वाघ व वन्यप्राणी संघर्ष कमी होईल. नवीन अधिवास विकास तयार करुन त्याचा विकास करणे, नवीन संरक्षित क्षेत्र तयार केल्यास वाघ सुरक्षित होतील. 

नितीन देसाई, संचालक मध्य भारत, वाईल्ड लाईफ प्रोटेक्‍शन सोसायटी ऑफ इंडिया 

आम्ही सावधच 

वाघांची संख्या वाढत असताना संघटीत शिकाऱ्यांपासून सावध राहण्यासाठी वन विभागाला डोळ्यात तेल घालून संरक्षण करावे लागणार आहे. बेसावध राहून चालणार नाही. वाघ वाढल्याने अंतर्गत संघर्षातही वाघांचे मृत्यू होत आहेत. नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) 

 

  • स्थळ : वाघांची संख्या 
  • भारत  : 2967 
  • महाराष्ट्र : 312 
  • कान्हा, पेंच, अचानक मार्ग व्याघ्र प्रकल्प : 308 
  • मेळघाट व सातपुडा प्रकल्प : 99 
  • ताडोबा, नवेगाव- नागझिरा, उमरेड- कऱ्हांडला, टिपेश्‍वर : 219 
  • सह्यांद्री प्रकल्प : 03 
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com