esakal | अत्याचारानंतर विद्यार्थिनी चार महिन्यांची गर्भवती; ‘हेल्थ चेकअप’मध्ये आले सत्य पुढे
sakal

बोलून बातमी शोधा

The student is four months pregnant after the atrocity Nagpur crime news

शुभम याने तिला लग्नाचे आमिष दाखविले. घरी कुणी नसताना तिच्यावर क्वॉर्टरमध्येच बलात्कार केला. मार्चमध्ये रियाची प्रकृती बिघडली. तिच्या पोटात दुखत असल्यामुळे आईने तिला हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी तपासून मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे निदान केले. यामुळे आईला धक्का बसला.

अत्याचारानंतर विद्यार्थिनी चार महिन्यांची गर्भवती; ‘हेल्थ चेकअप’मध्ये आले सत्य पुढे

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : पोट दुखत असल्यामुळे अकरावीची विद्यार्थिनी आईसोबत ‘हेल्थ चेकअप’ला गेली. डॉक्टरांनी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे निदान केले. डॉक्टरांच्या तोंडून शब्द ऐकताच मुलीच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली. मुलीला तेथेच कानशिलात लगावली. तेथून थेट पोलिस स्टेशन गाठले. तक्रारीवरून पोलिसांनी प्रियकरावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. शुभम शंकरराव रोडके (वय २४, रा. गणेशपेठ पोलिस क्वार्टर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शुभम याचा भाऊ नागपूर पोलिस दलात कार्यरत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ वर्षांची मुलगी रिया (बदललेले नाव) वाणिज्य शाखेची अकरावीची विद्यार्थिनी आहे. दीड वर्षापूर्वी तिची पोलिस क्वॉर्टरमध्ये राहणाऱ्या शुभम रोडके याच्यासोबत ओळख झाली. तो इंजिनिअर असून एका खासगी कंपनीत नोकरीवर आहे. दोघांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. डिसेंबर २०२० मध्ये त्याने तिला पोलिस क्वॉर्टरवर बोलावले. तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, तिने नकार दिला.

अधिक माहितीसाठी - रणजित सफेलकरची पोलिसांनी काढली धिंड; अनवाणी पायाने, बरमुड्यावरच नेले न्यायालयात

शुभम याने तिला लग्नाचे आमिष दाखविले. घरी कुणी नसताना तिच्यावर क्वॉर्टरमध्येच बलात्कार केला. मार्चमध्ये रियाची प्रकृती बिघडली. तिच्या पोटात दुखत असल्यामुळे आईने तिला हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी तपासून मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे निदान केले. यामुळे आईला धक्का बसला.

मुलीकडे विचारणा केली असता शुभम याने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारिरिक संबंध प्रस्थापित करीत असल्याचे सांगितले. मुलीच्या आईने पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून शुभम याला अटक केली. त्याची चार दिवस पोलिस कोठडी घेतली.