परीक्षा तीन दिवसांवर, पण अजूनही दिशानिर्देश नाहीच; विद्यार्थी संभ्रमात

student not get information yet from nagpur university about exam
student not get information yet from nagpur university about exam
Updated on

नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा (२०२०) २५ मार्चपासून सुरू होणार आहेत. यावेळी प्रथमच संकेतस्थळावरुन (वेबबेस्ड) परीक्षा घेण्यात येणार आहेत. त्यामुळे परीक्षा नेमक्या कशा होतील याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. मात्र, परीक्षा तीन दिवसावर आली असताना त्याबाबत कुठलेच दिशानिर्देश काढले नसल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. 

विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेच्या २५ मार्चपासून सुरू होणाऱ्या पहिल्या टप्प्यात बी.एस्सी., बी.कॉम., बीसीए, बी.फॉर्म, बीबीए, बीए, एलएलबी व इतर अभ्यासक्रमांची परीक्षा सुरू होणार आहे. मात्र, परीक्षा कशा होणार, परीक्षेचे स्वरूप कसे राहणार याबाबत कुठल्याही सूचना आलेल्या नाहीत. परीक्षा ऑनलाइन होणार एवढीच माहिती विद्यार्थ्यांकडे आहे. आता ऑनलाइन परीक्षेसाठी विद्यापीठ प्रोमार्क कंपनीची मदत घेणार आहे. मात्र, यावेळी परीक्षेसाठी 'अ‌ॅप' नसून परीक्षा संकेतस्थळावरुन (वेबबेस्ड) घेण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांना संगणक वा कोणत्याही अ‌ॅन्ड्राईड मोबाईलवर पेपर देता येणे शक्य होणार आहे. संगणकासाठी विद्यार्थ्यांकडे वेबकॅम असणे आवश्यक राहणार आहे. मात्र, त्याबाबत कुठलेच दिशानिर्देश काढले नसल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. 

दोन दिवसात घोषणा - 
विद्यार्थ्यांच्या हिवाळी परीक्षा नेमक्या कशा पद्धतीने घेण्यात येणार आहे, याची घोषणा रविवारी करण्यात येणार आहे. त्यानुसार २२ मार्चला त्याची चाचणी करण्यात येईल. विद्यार्थ्यांना परीक्षेचा नमुना समजण्यासाठी पुरेसा वेळ आहे. गेल्या एका वर्षात विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देत आहेत. त्यामुळे यावेळी त्यांना परीक्षा देणे कठीण होणार नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर लिंक दिली जात आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवणार नाही अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले. 

विद्यापीठाने उन्हाळी परीक्षा २०२० मध्ये झालेल्या चुकांमधून धडा घेऊन परीक्षा पद्धतीत मोठा बदल घडविण्याच्या मानस व्यक्त केला आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे मागील परीक्षेप्रमाणे, विद्यार्थ्यांकडे ५० पैकी २५ प्रश्न सोडविण्याचा पर्याय नसेल. विद्यार्थ्यांना सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य असेल. परीक्षेत मिक्स प्रकाराचे प्रश्न असतील. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना एमसीक्यू, रिक्त जागा भरा, जोड्या लावा, लहान उत्तरे, लांब उत्तरे यासारखे प्रश्न सोडवावे लागतील. यासह कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी 'प्रॉक्टोरिंग'चीही व्यवस्था केली जाणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com