विद्यार्थी शिक्षणापासून वंचित; कारण, शाळा सुरू पण एसटी बंद

Students are deprived of education as ST is closed Nagpur Education news
Students are deprived of education as ST is closed Nagpur Education news

उमरेड (जि. नागपूर) : शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार १४ डिसेंबरपासून ग्रामीण भागातील नववी ते बारावीच्या शाळा नियमित सुरू आहेत. नियमित अभ्यासक्रम शिकविले जात आहेत. परंतु, ग्रामीण भागातील विद्यार्थी शालेय शिक्षणापासून वंचित आहेत. ग्रामीण भागात राज्य परिवहन महामंडळाच्या बस बंद असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत येणे शक्य होत नाही.

उमरेड ग्रामीण भागातील विद्यार्थी जवळपास प्राथमिक ते पदवीपर्यंत शिक्षण घेत आहेत. उमरेड येथे प्राथमिक शिक्षण इंग्रजी, हिंदी, मराठी तसेच कॉन्व्हेंट, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग आदी शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना उमरेडशिवाय पर्याय नाही. सद्यःस्थितीत ९ ते १२ पर्यंतचे वर्ग १४ डिसेंबरपासून सुरू झाले आहेत.

बसफेऱ्या बंद असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाने ग्रामीण भागातील बस फेऱ्या लवकरात लवकर सुरू कराव्या, अशी मागणी पालकांनी आमदार राजू पारवे, जिल्हा परिषदचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य यांच्याकडे केली. कोरोनामुळे गेल्या नऊ-दहा महिन्यांपासून शाळा-महाविद्यालय बंद आहेत. वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी बससेवा बंद होती.

कालांतराने लांब पल्ल्याची बससेवा सुरू करण्यात आली. कोरोनाचे संक्रमण कमी झाल्याने नववी ते बारावीच्या शाळा १२ डिसेंबरपासून सुरू करण्यात आल्या. बससेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांना शाळांमध्ये पाठविण्यात अडचण निर्माण होत आहे. काही पालक पाल्यांना शाळेत पाठवित नाहीत. तर काही खाजगी वाहनाने तर काही स्वतःच्या वाहनाने मुलांना शाळेत सोडतात. 

लवकरच फेऱ्या सुरू होतील

ग्रामीण भागात बसफेऱ्या सुरू करण्यासाठी वरिष्ठ विभागीय स्तरावरील अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन बसफेऱ्या सुरू करण्यात येतील. शाळा, महाविद्यालय व पालकांकडून मागणी असल्याने वरिष्ठांना सांगून त्यानुसार बसफेऱ्या सुरू करण्यात येतील. बसफेरीला पंधरा रुपये याप्रमाणे एका किलोमीटर खर्च येतो. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या महामंडला विचार करावा लागतो.

पाचवी ते बारावीच्या मुलींसाठी अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत मुलींना निःशुल्क एसटी प्रवास करण्यासाठी सवलत दिली आहे. त्यावर शासनाकडून खर्च केला जातो. साडेतीन हजार ते चार हजार किलोमीटर उमरेड आगारातील पंधरा बसेस सतत चालतात. आगामी काळात ग्रामीण भागातील बसेस सुरू करण्यात येतील, असे उमरेड महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापक संजय डफरे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com