अखेर ते 233 विद्यार्थी मायभूमीकडे रवाना

train
train

नागपूर : शिक्षणासाठी घरापासून दूर रहात असलेले विद्यार्थी अचानक झालेल्या टाळेबंदीमुळे अडकून पडले. अनेकदा खाण्यापिण्याचेही हाल सहन करावे लागले. घरची ओढही स्वस्थ बसू देत नव्हती. खूप प्रयत्नांनंतर एकदाचा त्यांचा घरी परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कामगारांसाठीच्या स्पेशल ट्रेनने ते विद्यार्थी नुकतेच लेह-लद्दाखला त्यांच्या घरी रवाना झाले आहेत.
देशभरात टाळेबंदी लागू करण्यात आल्याने उपासमार होत असलेले कामगार पायदळ चालून आपापल्या घरी पोहचण्याचा प्रयत्न करीत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून कामगारांना त्यांच्या मायभुमीत परत पाठविण्यासाठी स्पेशल रेल्वेची सोय करून देण्यात येत आहे. नागपुरात फसलेल्या 233 विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी कल्याण विभागाद्वारे करण्यात आलेल्या प्रयत्नानंतर गुरूवारी (ता.14) रात्री बारा वाजता श्रमिक स्पेशल ट्रेनद्वारे पाठविण्यात आले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विविध विभागासह संलग्नित महाविद्यालयात जवळपास 233 विद्यार्थी शिकतात. हे विद्यार्थी टाळेबंदीमुळे विद्यापीठाच्या वसतिगृहासह विविध ठिकाणी वास्तव्यास होते. मात्र, टाळेबंदीत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. दरम्यान विद्यापीठाकडून त्यांना मदत म्हणून रेशन किट देण्यात येत होत्या. मात्र, त्या किट संपल्यावर पुन्हा त्यांच्यासमोर जेवणाचा प्रश्‍न निर्माण झाला होता. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना घराची ओढ लागल्याने केव्हा घरी जातोय अशी अवस्था झाली होती. त्यातूनच विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. अभय मुदगल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासह पोलिस विभागाकडून परवानगी मिळवली. यानंतर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात या विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांना लेह लद्दाख येथे पाठविण्यासाठी परवानगी मिळविली. आता त्यांच्यासोबत काही विद्यार्थ्यांचे पालक आणि कामगारही पाठविण्यात आले आहे. गुरुवारी सायंकाळी रात्री बारा वाजता श्रमिक रेल्वेमार्फत त्यांना पाठविण्यात आले.

सविस्तर वाचा - आता बस चालकालाही झोडपले
मोमीनपु-यातील त्या विद्यार्थ्यांना परवानगी नाहीच
मोमीनपुऱ्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या बघता, या परिसरात वास्तव्यास असलेल्या सात विद्यार्थ्यांना लेह लद्दाख येथे पाठविण्यासंदर्भातील परवानगी देण्यास प्रशासनाकडून नकार देण्यात आला. विशेष म्हणजे शहरातील 316 कोरोनाबाधित रुग्णांपैकी एकट्या मोमीनपुऱ्यातील 150 रुग्णांचा समावेश होता. त्यामुळे सावधानता म्हणून प्रशासनाद्वारे या सात विद्यार्थ्यांना जाण्यास परवानगी देण्यात आलेली नसल्याचे समजते. प्रशासनाद्वारे या सातही जणांना क्वारन्टाईन करण्यात आल्याचे समजते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com