esakal | पावसाळ्याच्या दिवसांत मुलांना सांभाळा, उघडकीस आली ही धक्‍कादायक घटना...
sakal

बोलून बातमी शोधा

Take care of children on rainy days

पारडी हद्दीतील मोकळ्या जागेत बेवारस अवस्थेत अर्भक आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. अनैतिक संबंधावर पडदा टाकण्यासाठी अर्भक टाकून देण्यात आले असावे, असा कयास लावला जात आहे.

पावसाळ्याच्या दिवसांत मुलांना सांभाळा, उघडकीस आली ही धक्‍कादायक घटना...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नागपूर : शहरातील वेगवेगळ्या घटनांमध्ये वृद्धासह दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली. शांतीनगर व हुडकेश्‍वर हद्दीत या घटना घडल्या. विषारी किडा चावल्याने 13 वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना हिंगणा हद्दीत घडली.

शांतीनगर हद्दीतील नारायणपेठ येथील रहिवासी विवेक लाडकर (30) याने राहत्या घरी व्हेंटिलेटर खिडकीला साडी बांधून गळफास लावून घेतला. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. हुडकेश्‍वर हद्दीतील उमप ले-आउट, आम्रपालीनगर येथील रहिवासी जगन्नाथ ठाकरे (62) यांनी घरीच छताच्या लोखंडी हूकला नायलॉनच्या दोरीने बांधून गळफास लावून घेतला. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. दोन्ही प्रकरणांमध्ये आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.

हिंगणा हद्दीतील गुमगाव येथे राहणारा आयुष मेश्राम हा 13 वर्षीय बालक 15 जून रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास घरीच असताना त्याला विषारी किड्याने दंश केला. असह्य वेदना होऊ लागल्याने त्याला उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान गुरुवारी रात्री 10 वाजता त्याचा मृत्यू झाला. तिन्ही प्रकरणांमध्ये संबंधित पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

नागपूरच्या बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा

बेवारस अर्भक आढळल्याने खळबळ

पारडी हद्दीतील मोकळ्या जागेत बेवारस अवस्थेत अर्भक आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. अनैतिक संबंधावर पडदा टाकण्यासाठी अर्भक टाकून देण्यात आले असावे, असा कयास लावला जात आहे. पारडी परिसरातील काजल बारच्या मागील मोकळ्या जागेत गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास अर्भक आढळून आले. माहिती पसरताच बघ्यांनी एकच गर्दी केली. बुधवारी रात्रीनंतर कुणीतरी अर्भक आणून टाकले असण्याची शक्‍यता आहे. अज्ञात आरोपीने अपत्य जन्माची बाब लपविण्यासाठी हे कृत्य केले असण्याची शंका आहे. घटनेची माहिती मिळताच पारडी पोलिसांनी घटनास्थळ गाठून अर्भक ताब्यात घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल करीत आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे.