अरे हे काय, परीक्षेनंतरही द्यावा लागतोय पेपर

मंगेश गोमासे
Wednesday, 4 November 2020

विद्यापीठाच्या परीक्षा ८ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान घेण्यात आल्यात. यासाठी विद्यार्थ्यांनी सर्व कागदपत्र जमा केले. यानंतर मिळालेल्या प्रवेशपत्रात विद्यार्थ्यांच्या पूर्ण विषयांचा समावेश करण्यात आला. मात्र, बीएस.स्सीसह एमबीए आणि विविध अभ्यासक्रमाच्या बऱ्याच विद्यार्थ्यांचे पेपर सिंक झाले नसल्याची तक्रार करण्यात आली. 

नागपूर  ः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत तांत्रिक गोंधळामुळे विद्यार्थ्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. अगोदरच परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे.

विद्यापीठाच्या परीक्षा ८ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान घेण्यात आल्यात. यासाठी विद्यार्थ्यांनी सर्व कागदपत्र जमा केले. यानंतर मिळालेल्या प्रवेशपत्रात विद्यार्थ्यांच्या पूर्ण विषयांचा समावेश करण्यात आला. मात्र, बीएस.स्सीसह एमबीए आणि विविध अभ्यासक्रमाच्या बऱ्याच विद्यार्थ्यांचे पेपर सिंक झाले नसल्याची तक्रार करण्यात आली. 

हेही वाचा - Success Story: तरुणीने फुलवला मशरूमचा मळा; कृषी शाखेच्या विद्यार्थिनीचा नाविन्यपूर्ण उपक्रम 
 

मात्र, या तक्रारीवर विद्यार्थ्यांना पेपर जमा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच पेपर एक तासात ॲपवर जमा होईल असेही सांगण्यात आले. मात्र, २२ ऑक्टोबरनंतर विद्यार्थ्यांनी परीक्षा विभागात संपर्क साधला असता, त्यांची कुठलाही कागदपत्रे जमा करण्यात आली नसल्याचे सांगणात आले. 

त्यामुळे या विद्यार्थ्यांना गैरहजर दाखविण्यात आले. त्यामुळे पेपर दिल्यावरही महाविद्यालयात आलेल्या विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये पूर्ण पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे आहे. त्यामुळे सर्व विषयांची पुन्हा परीक्षा द्यावी लागणार का? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.  

 

विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही
बऱ्याच विद्यार्थ्यांनी व्यवस्थितरीत्या पेपर सबमिट केला नसल्याचे दिसून येते. पेपर सबमिट करण्यासाठी आम्ही सविस्तर मार्गदर्शक सूचना दिलेल्या होत्या. विद्यार्थ्यांनीच या सूचना न वाचता कुठलीतरी आवश्यक प्रक्रिया केली नसल्याने हा प्रकार घडल्याचे दिसून येते. आम्ही हजारो विद्यार्थ्यांची यशस्वीरीत्या परीक्षा घेतली. काही निवडक प्रकरणांमध्ये विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा घ्यावी लागणार आहे. इतर विद्यापीठांच्या तुलनेत आमच्या परीक्षा चांगल्या पद्धतीने पार पाडल्या आहेत. कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही.
- प्रफुल्ल साबळे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ. 

संपादन  : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Technical confusion in Nagpur University final year exams