
नागपूर : रस्ता रोखल्याचा फोटो; फेसबुकवर पोस्ट झाला. काहींनी सामाजिक तेढ निर्माण करणारी कमेंट करीत तो व्हायरल केला. बाहेरची मंडळी येऊन थुंकत असल्याची अफवा वणव्याप्रमाणे पसरत गेली आणि तणावाची स्थिती निर्माण झाली. या प्रकाराने सोमवारी दक्षिण नागपूरच्या चिटणीसनगरात चांगलेच "महाभारत' घडले. महापालिकेच्या उपद्रव शोधपथकासह स्थानिक नगरसेवकांनी धाव घेत रस्ता मोकळा केला, त्यानंतरच हे प्रकरण निवळले.
कोरोनाच्या दहशतीमुळे रहिवाशांनी अंतर्गत रस्ते बंद करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी या प्रकाराचे समर्थन आणि कौतुकही केले. त्याचीच प्रेरणा घेत दक्षिण नागपुरात असणाऱ्या चिटणीसनगरातील युवकांनीही सोमवारी दोर बांधून रस्ता अडविला. रमणा मारोतीपासून मोठ्या ताजबागकडे जाणारा हा मार्ग मुख्य रस्ता आहे. कुणीतरी अडविलेल्या रस्त्याचा फोटो काढून फेसबुकवर टाकला. त्याखाली वाट्टेल तशा कमेंट्स लिहिणे सुरू झाले. त्यातच जवळच्या भागातील मंडळी येऊन थुंकत असल्याची आणि त्यामुळे कोरोना पसरण्याची भीती असल्याची भावना काहींनी व्यक्त केली. या प्रतिक्रियेचे "स्क्रिन शॉट' व्हॉट्सऍपवरूनही पसरत गेले. लोकं येऊन थुंकत असल्याच्या अफवेने चांगलाच जोर धरला. याप्रकारची वार्ता प्रशासनापर्यंत पोहोचण्यासही वेळ लागला नाही. महापालिकेच्या उपद्रव शोधपथकाला पाचारण करण्यात आले. स्थानिक नगरसेवकानेही धाव घेतली. प्रत्यक्ष जाऊन बघितले असता कोरोना पसरविण्यासाठी नाही तर रस्त्याने जाणारी आणि खर्रा, पान खाणारी मंडळी थुंकत असल्याचे समोर आले.
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
दहशतीच्या वातावरणातही या मार्गावरून सर्रास वाहतूक सुरू आहे. दुचाकीस्वर ट्रीपलसिट आणि चारचाकी वाहनातून 8 ते 10 जण एकाचवेळी जात असून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविला जात आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठीच रस्ता अडविल्याचे युवकांचे म्हणणे होते. युवकांची समजूत काढत रस्ता मोकळा करण्यात आला. शिवाय रस्त्यावर कुणी थुंकल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन रहिवाशांना देण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.