होम ट्यूशन घेणाऱ्या महिलेच्या डोक्‍यावर होता कर्जाचा डोंगर, मग निवडला हा पर्याय...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 9 February 2020

महिला उच्चशिक्षित असून, मुलांना होम ट्यूशन देण्याचे काम करीत करायची. मात्र, तिच्या डोक्‍यावर कर्जाचा डोंगर होता. यातून कशी सुटका करायचा असा प्रश्‍न तिला पडत होता. यातूनच तिने चोरी करण्याचा मार्ग स्वीकारला. यासाठी तिने विद्यार्थ्यांच्या घराची निवड केली. होम ट्यूशन देत असताना ती विद्यार्थ्यांच्या घरी चोरी करायची. यातूनच तिला व सहकारी महिलेला पोलिसांनी अटक केली. 

नागपूर : कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या ट्यूशन टीचरने कर्जाची परतफेड करण्यासाठी आपल्याच विद्यार्थ्यांच्या घरी चोरी करण्यास सुरुवात केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर हुडकेश्‍वर पोलिसांनी तपास सुरू केला. ट्यूशन टीचर आणि तिच्या मैत्रिणीला अटक करण्यात आली. अटकेतील महिलांमध्ये न्यू कैलाशनगर निवासी काजल अनिल तायडे (36) आणि कल्पना विजय दारवेकर (30) यांचा समावेश आहे. 

काजल सुशिक्षित असून, मुलांना होम ट्यूशन देण्याचे काम करते. डिसेंबर महिन्यात ती विनकर कॉलनी, मानेवाडा चौक निवासी अर्चना पठाडे यांच्या घरी मुलीला शिकविण्यासाठी गेली. अर्चना बाथरूममध्ये असताना काजलने मुलीला चॉकलेट आणण्यासाठी घरून बाहेर पाठविले. यानंतर तिने कपाटातील 1.34 लाख रुपयांच्या दागिन्यांवर हातसाफ केला.

हेही वाचा - लाखनीत झाला शिक्षिकेच्या अपहरणाचा प्रयत्न; आरोपी व्हॅनटालकास अटक

चार फेब्रुवारीला कल्पना नावाच्या मैत्रिणीसह काजल जुन्या सुभेदार ले-आउटमध्ये राहणाऱ्या स्मिता राहुल सावरकर यांच्या घरी गेली. पूर्वी ती स्मिताच्या मुलीला ट्यूशन देत होती. यामुळे स्मिता आणि काजलमध्ये चांगली मैत्री झाली. बाथरूमला जाण्याच्या बहाण्याने काजल बेडरुममध्ये गेली. दरम्यान कल्पनाने सिमताला बोलण्यात गुंतवूण ठेवले. काजलने कपाटातील स्टीलचा डब्बा काढून त्यातील सोन्याचे दागिने चोरी केले. माल हातात येताच दोघींनीही पळ काढला. 

स्मिताने त्यांना आवाज दिला मात्र न ऐकल्याखारखे करीत पसार झाल्या. हुडकेश्‍वरचे ठाणेदार राजकमल वाघमारे यांच्या मार्गदर्शनात पोउपनि शुभांगी मोहारे, पोहवा मनोज नेवारे, प्रवीण गाणार, विलास चिंचुलकर, चंद्रशेखर कौरती, प्रफुल वाघमारे आणि मयूर सातपुते यांनी तपास सुरू केला. पोलिसांनी दोघींनाही कैलाशनगर परिसरातून अटक केली. मोबाईल आणि दुचाकी वाहन जप्त करण्यात आले. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft of Women to Repay Debt