आनंदाची बातमी, आता टिपेश्‍वरमध्येही व्याघ्र सफारी

There Will Be a Tiger Safari in Tipeshwar
There Will Be a Tiger Safari in Tipeshwar

नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यात हमखास व्याघ्रदर्शनाचे नवे डेस्टिनेशन झाल्याने आता पर्यटकांचा ओढा वाढला आहे. वनमंत्री संजय राठोड यांचा हा गृह जिल्हा असल्याने त्यांनी टिपेश्‍वर अभयारण्यालगतच व्याघ्र सफारीचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयात व्याघ्र सफारीचा प्रस्ताव युद्धपातळीवर तयार करण्यात येत आहे. 

अत्यंत दुर्लक्षित असलेल्या या जंगलाला 1998 मध्ये अभयारण्याचा दर्जा मिळाला. अभयारण्यात 15 पट्टेदार वाघांचे वास्तव्य आहे. याशिवाय अस्वल, बिबट, रोही, चितळ, सांबर, रानडुक्कर, नीलगाईसह 160 प्रकारच्या पक्ष्यांचा अधिवास आहे. नैसर्गिक वनसंपत्तीने नटलेल्या व 148 चौरस किलोमीटर परिसरात विस्तारलेल्या या अभयारण्यात हमखास व्याघ्रदर्शन होत असल्याने विदर्भातीलच नव्हे, तर शेजारच्या राज्यातील पर्यटक या अभयारण्यात सफारीसाठी येत आहेत. दक्षिण विदर्भात एकमेव हे अभयारण्य असल्याने या परिसरात व्याघ्र सफारी सुरू करण्यात येत आहे. यादृष्टीने सर्वस्तरातून प्रयत्नदेखील सुरू आहेत.

टिपेश्वर अभयारण्यातील क्षेत्र हे वाघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे व सुरक्षित असे क्षेत्र आहे. येथील वाघाने तब्बल तीन हजार किलोमीटरचा प्रवास करून नवा विक्रम केला आहे. पांढरकवडा प्रादेशिक वनविभागातील गोंडवाकडी येथे 70 हेक्‍टरपैकी उपलब्ध असलेली 32 हेक्‍टर शासकीय जमीन वनविभागास हस्तांतरित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता मिळविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. टिपेश्‍वर अभयारण्यात निसर्ग पर्यटनही विकसित केले जात आहे. याशिवाय या अभयारण्यात तृणभक्षक प्राणी सोडण्याचेही निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे वाघांना मुबलक प्रमाणात खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. 

  टिपाईदेवी मंदिर परिसर, विविध पाणवठे, पिलखान नर्सरी या भागात आतापर्यंत अनेक पर्यटकांना वाघाचे दर्शन नियमित होत असते. वाघांची संख्या मोठी असल्याने दिवसेंदिवस या अभयारण्यात पर्यटकांची गर्दी वाढत आहे. पर्यटकांना आणखी आवश्‍यक सोई-सुविधा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रात व्याघ्र सफारी तयार करण्यात येणार आहे. सफारीसाठी ऑनलाइन बुकिंगची व्यवस्था आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com