They are supplying food to needy people in lockdown
They are supplying food to needy people in lockdown

माणूसपण जपणारे मित्र करताहेत रोज पंधराशे गरजूंच्या जेवणाची सोय

Published on

नागपूर : कोरोनाच्या या संकटकाळात गरीब-गरजुंसाठी अनेक मदतीचे हात पुढे आले आणि धकाधकीच्या आजच्या काळातही माणूसपण जिवंत असल्याची खात्री पटवणाऱ्या अनेक घटना समोर आल्या. तरुण मंडळीही यामध्ये मागे नाहीत, हे देखील या प्रसंगी सिद्ध झाले. गरजवंतांच्या पोटाची सोय करणारे असेच एक मित्रमंडळ जयताळा भागात गेल्या आठ दिवसांपासून कार्यरत आहे.

कोरोनाच्या वेदना केवळ बाधितांनाच बसत आहेत असे नाही तर तळहातावर पोट भारणाऱ्यांना देखील झळ सोसावी लागते आहे. जयताळा येथील एकात्मतानगर भागातील बहुसंख्य गरजुंची गरज लक्षात घेऊन पारेंद्र पटले व त्यांच्या चमुने भोजनदानाचा पर्याय अवलंबला आहे. विशेष म्हणजे सोशल डिस्टसिंग ठेवून हा उपक्रम गेल्या आठ दिवसांपासून सुरू असून, तब्बल पंधराशे जणांची व्यवस्था येथे करण्यात आली आहे.

या भागातील अनेकांकडे अद्यापही रेशनकार्ड नाहीत. शिवाय काही लोक झोपडीत राहातात. त्यांच्या जेवणाची काहीही व्यवस्था नाही. अशा लोकांचा शोध घेऊन पारेंद्र पटले मित्र परिवाराने घेतला असून गरजूंच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रारंभीच्या काळात अन्न धान्याच्या किट या भागातील नागरिकांना वितरित करण्यात आल्या. या उपक्रमाचा सुमारे आठशे ते हजार कुटुंबांना फायदा झाला आहे.

या उपक्रमाला जयताळा बाजारातील होलसेल भाजी मार्केटची मोठी मदत झाली. मित्रपरिवारातील सदस्यांकडून नियमित पंधराशे जणांच्या भाजी व भाताची व्यवस्था करण्यात येते. या उपक्रमात पारेंद्र पटले यांच्यासोबत भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते राहुल क्षीरसागर, अंकित वानखेडे, राकेश रोकडे, सागर आगलावे , धीरज चंदनकर, आकाश शाहू, शुभम डोबाडे, भैय्याजी रहांगडाले, आकाश आकाश तुरकर, आशिष फुंडे, अमित भैरम, मयूर सायरे, आकाश घोडे, विकास मस्के, गणेश, शुभम पारधी, नरेंद्र चौधरी, आशिष तुरकर, जुतू पाल व कार्यकर्ते जुळले आहेत. लॉकडाऊन संपेपर्यंत हा उपक्रम असाच सुरू ठेवणार असल्याचे पारेंद्र पटले यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com