esakal | संकटकाळातही ते जपताहेत माणुसकीचा धर्म
sakal

बोलून बातमी शोधा

patel

शहरातील विविध भागात भूक, तहान विसरुन ते दिवसरात्र तैनात आहेत. दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढतो आहे. उन्हामध्ये कर्तव्य निभावणाऱ्या पोलिसांसाठी पाण्याचा घोट किती महत्त्वाचा आहे, याची जाणिव ठेवत सरदार पटेल युवक मंडळाने कर्तव्यावर असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना पाण्याच्या बाटल्या पुरविण्याचा वसा घेतला आहे.

संकटकाळातही ते जपताहेत माणुसकीचा धर्म

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोणतीही आपतकालीन स्थिती असो, उन्ह, पुर अथवा दंगे. खाकी वर्दीतील पोलिस नेहमीच कर्तव्यावर हजर असतात. कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी राज्यात संचारबंदी लागू झाली असतानाही पोलिस नेहमीप्रमाणेच आपले कर्तव्य इमानेइतबारे निभावित आहेत. शहरातील विविध भागात भूक, तहान विसरुन ते दिवसरात्र तैनात आहेत. दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढतो आहे. उन्हामध्ये कर्तव्य निभावणाऱ्या पोलिसांसाठी पाण्याचा घोट किती महत्त्वाचा आहे, याची जाणिव ठेवत सरदार पटेल युवक मंडळाने कर्तव्यावर असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना पाण्याच्या बाटल्या पुरविण्याचा वसा घेतला आहे. जगाला ग्रासणाऱ्या या संकटप्रसंगीही माणुसकीचा धर्म जिवंत असल्याचे यानिमित्ताने दिसून आले आहे.
सरदार पटेल युवक मंडळाचे अध्यक्ष उमेश पटेल, विनोद चावला, सतीश पटेल या संस्थेच्या सदस्यांनी यात सहभाग घेतला आहे. शहरातील अनेक चौकात असा माणुसकीचा धर्म निभावणारे नजरेला सुखावणारे चित्र दिसले.
उपराजधानीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोमवारपासून संचारबंदी घोषित झाली आहे. संचारबंदीदरम्यान रस्त्यावर अनुचित घटना घडू नये, नागरिक रस्त्यांवर निघू नयेत ही खबरदारी घेण्यासाठी पहाटेपासूनच खाकी वर्दी रस्त्यावर आली. प्रत्येक चौकात केवळ खाकी वर्दीतील माणसे दिसत आहेत. आणि काळ्या डांबरी रस्त्यावरून फिरणारी पोलिसांची वाहनं दिसत आहेत. अशा निमर्नुष्य रस्त्यांवर पोलिस मात्र तहान भूक विसरून आपले कर्तव्य सांभाळत आहेत.

सविस्तर वाचा - त्या अठ्ठावीस प्रवाशांची गाडी सुटली आणि मग! वाचा यांची संवेदनशीलता

बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची काळजी घेण्यासाठी सामाजिक क्षेत्रातील पटेल युवक मंडळाने पुढाकार घेत त्यांना पाण्याचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ते पाण्याचे वाटप करीत आहेत. त्याच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. या काळात कोरोनाबद्दल जनजागृती करण्यात येणार असल्याचेही उमेश पटेल यांनी सांगितले.

go to top