"त्या' शिक्षकांची पुन्हा होणार विभागीय चौकशी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

सर्वांवरील आरोप समान असताना पाच शिक्षकांना दोष मुक्त ठरविल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत होते. पाचही शिक्षकांचा अहवाल फेटाळून नव्याने चौकशी करण्याचे आदेश सीईओंनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

नागपूर : नियमबाह्यरित्या प्रवास भत्त्याची उचल केल्याचा ठपका असलेल्या 45 पैकी 30 शिक्षकांनी विभागीय चौकशी पूर्ण झाली असून पाच शिक्षकांना दोष मुक्त ठरविण्यात आले. सर्वांवरील आरोप समान असताना पाच शिक्षकांना दोष मुक्त ठरविल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत होते. पाचही शिक्षकांचा अहवाल फेटाळून नव्याने चौकशी करण्याचे आदेश सीईओंनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. 
पतसंस्थेत असताना शाळेत असल्याचे दर्शवून शिक्षकांनी प्रवास भत्त्याची उचल होती. याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश 2017 मध्ये तत्कालीन सीईओ डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिले होते. 45 शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. यात शिक्षक संघटनांशी संबंधित पदाधिकारी, नेत्यांचाही समावेश आहे. शिक्षकांच्या स्पष्टीकरणावर असमाधान व्यक्त करीत सीईओ बलकवडे यांनी विभागीय चौकशी सुरू केली.

सरकारचा ग्राम पंचायतींवर मर्जीतील व्यक्तीच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा 

चार वर्षानंतर आता संपूर्ण 45 शिक्षकांच्या फाईल्स गट शिक्षणाधिकाऱ्यांनी पाठविल्या. वर्षभरापूर्वी जवळपास 30 शिक्षकांच्या फाईल्स आल्या. विभागीय चौकशी अधिकारी यांच्याकडे या फाईल्स पाठविण्यात आल्या. विभागीय चौकशी अधिकारी यांनी यातील 25 शिक्षकांना अंशत: दोषी ठरविले असून 5 शिक्षकांना दोष मुक्त ठरविले. सर्व शिक्षकांवर समान ठपका आहे. असे असतानाही विभागीय चौकशी अधिकारी यांनी पाच शिक्षकांना दोष मुक्त ठरविले. "अर्थ' पुराव्यातून अहवाल तयार झाल्याची चर्चा जिल्हा परिषदेत होती. शिक्षण विभागाने दोष मुक्त ठरविण्यात आलेल्या पाचही शिक्षकांची फाईल अंतिम मंजुरीसाठी सीईओ यांच्याकडे सादर केली. सीईओंनी या दोष मुक्तीच्या अहवालावर असमाधान व नाराजी व्यक्त केली. त्यांची फाईल परत पाठवून नव्याने विभागीय चौकशी करण्याचे निर्देश शिक्षण विभागाला दिले. त्यामुळे पाचही शिक्षकांची अर्थपूर्ण मेहनत वाया गेल्याची चर्चा रंगली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Those 'teachers will be departmental Inquiry again

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: