आठ वर्षांचा बालक 'पॉझिटिव्ह'; सोबत खेळणारे नऊ जण झाले 'क्वारंटाइन'

Three days lockdown in Katol taluka of Nagpur district
Three days lockdown in Katol taluka of Nagpur district

काटोल (जि. नागपूर) : नागपूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच आहे. रोज दोन अंकी आकड्यात होणाऱ्या वाढीमुळे प्रशासन चिंतेत आहे. असे असताना काटोलमध्ये गुरुवारी आठ वर्षीय बालकासह माय-लेक पॉझिटिव्ह निघाले. यामुळे बालकासोबत खेळणारी आठ ते नऊ बालके व त्यांच्या कुटुंबांना नागपूर वनामती, आमदार निवास व इतर ठिकाणी क्‍वारंटाइन करण्यात आले आहे. 

काटोल ग्रामीण रुग्णालयाने धडक मोहीम राबवून 39 संशयितांना नागपूरला पाठविले. यात नऊ बालकांचा समावेश असल्याचे डॉ. सुधीर वाघमारे यांनी सांगितले. या केसचे "कनेक्‍शन' रिधोरा असून, तेथील परिस्थिती सध्या आटोक्‍यात असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी शशांक व्यवहारे यांनी सांगितले.

रिधोरा येथील यापूर्वी 108 व्यक्तींना नागपूरला विलगीकरण कक्षात हलविले आहे. पारडसिंगा येथे गुरवारी 16 व्यक्ती केअर सेंटरला पाठविल्याची एकूण 55 रुग्ण पारडसिंगा येथे उपचार घेत आहेत. रिधोरा येथे यापूर्वी चार रुग्ण पॉझिटिव्ह तर काटोल येथे अन्य दोन तसेच गुरुवारला मायलेक मिळाल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या आठवर पोहोचली आहे. 

तीन दिवस जनता कर्फ्यूची तयारी

शहरात पॉझिटिव्ह रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता न. प. कार्यालयात तातडीची सभा बोलावून जनता कर्फ्यू लावण्याचे ठरविले आहे. काटोलच्या नगराध्यक्ष वैशाली ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली व्यापारी संघ, सामाजिक संस्था, राजकीय प्रतिनिधी यांच्यासोबत चर्चा करून रविवार ते मंगळवार असे तीन दिवस जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे नगराध्यक्ष वैशाली ठाकूर यांनी सांगितले. काटोल येथील राऊतपुरा भाग नव्याने सील केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com